Take a fresh look at your lifestyle.

केंद्र सरकारची कृषी उडाण योजना कशी आहे? असा घ्या लाभ!

0

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने काम करत असून त्याअनुषंगाने प्रधानमंत्री कृषी उडाण योजना सुरु करण्यात आली आहे.ही अशी एक योजना आहे ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळणार आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊयात…

पंतप्रधान कृषी उडाण योजना नक्की काय आहे? :

● विविध नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि योग्य वेळी पिके बाजारात नेण्यासाठी पंतप्रधान कृषी उडान योजना सुरू करण्यात आली.
● या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीसाठी मदत होणार आहे.

योजनेचा उत्पादनासाठी फायदा होणार : या योजनेच्या मदतीने शेतकरी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे उत्पादने लवकर त्यांच्या बाजारात दाखल करु शकतील. कारण हवाईच्या माध्यमातूनही याची वाहतूक करता येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा करून देण्याचा निर्धार सरकारने केलाय.

‘या’ पद्धतीने योजनेचा लाभ घ्या :

● शेतकऱ्यांना प्रथमता नोंदणी करावी लागेल. त्यानंतर योजनेचा लाभ घेता येईल.
● तसेच कृषी उदन योजनेअंतर्गत सरकारकडून विमान कंपन्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
● देशाच्या विविध भागात कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी विमानतळाचा वापर केला जाईल.
● याअंतर्गत उड्डाणांवरील किमान निम्म्या जागा अनुदानित भाड्यावर दिल्या जातील.

पात्रता आणि कागदपत्रे : भारताचा कायमचा रहिवासी, अर्जदार शेतकरी असावा, आधार कार्ड, शेतीशी संबंधित कागदपत्रे, निवासी प्रमाणपत्र, दोन उत्पन्न प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मोबाईल क्रमांक.

अर्ज करण्यासाठी :

● अर्जदारात प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
● तिथे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आपली संपूर्ण माहिती भरा.
● त्यानंतर अर्जदाराची नोंदणी होईल. आता फॉर्म सबमिट करा.
● यानंतर अर्जदाराची नोंदणी पूर्ण होईल.
● मोबाइल नंबर व्हेरिफिकेशनसाठी OTP तुमच्या नंबरवर दिसेल.
● हे अर्जदाराला आयडी आणि पासवर्ड तयार करण्यास मदत करेल. जे अर्जदाराला नंतर लॉग इन करण्यास उपयोगी पडेल.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.