Take a fresh look at your lifestyle.

‘रेड’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्ट म्हणजे काय? जाणून घ्या!

0

राज्यात सध्या ठीक-ठिकाणी मुसळधार पाऊस बरसात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून इशारा देण्यासाठी विविध रंगांचे कोड वापरले जात आहेत. परंतु, या वेगवेगळ्या अलर्टचा अर्थ काय? हे रंग काय दर्शवितात? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

  1. ग्रीन अलर्ट : हा अलर्ट म्हणजे हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही असा सल्ला दिला जातो.
  2. येलो अलर्ट : हा अलर्ट म्हणजे पुढील काही दिवस खराब हवामान असू शकते. त्यामुळे अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार “अपडेट रहा” असा सल्ला दिला जातो.
  3. ऑरेंज अलर्ट : हा अलर्ट म्हणजे हवामान अत्यंत खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे जीव किंवा मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अधिकाऱ्यांना “तयार रहा” अशी सूचना दिली जाते. या अलर्ट दरम्यान खराब हवामान आणि मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असतो.
  4. रेड अलर्ट : हा अलर्ट म्हणजे अत्यंत वाईट हवामान अपेक्षित असल्याचा अंदाज आहे. अधिकाऱ्यांसाठी एक चेतावणी असते कि, “कारवाई करा”. हा अ‍ॅलर्ट अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवतो.

    शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues