सरकारने लाँच केलेले ई-श्रम पोर्टल आहे तरी काय?
केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात कार्यरत देशातील कोट्यवधी कामगारांसाठी खुशखबर दिली आहे. कामगारांचे हित लक्षात घेऊन सरकारने ई-श्रम पोर्टल लाँच केले आहे.
रजिस्ट्रेशन सुरू
● मजूरांचे रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झाले असून यावर त्यांचा डाटाबेस तयार होईल.
● याच्या मदतीने सरकार सोशल सिक्युरिटी योजना त्यांच्या दरवाजांपर्यंत पोहचवणार आहे.
फायदा कोणाला होणार? : मजूर, प्रवासी मजूर, फेरीवाले-विक्रेता, घरगुती कामगार, बांधकाम कामगार, गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर, शेतमजूर आणि असंघटित क्षेत्रातील दुसरे कामगार.
नोंदणी करावे लागेल :
● मजूरांना स्वताची नोंदणी करावी लागेल.
● आपले नाव, कामाचे स्वरूप, पत्ता, शिक्षणिक पात्रता, कौशल्य, कौटुंबिक पूर्ण माहिती माहिती द्यावी लागेल.
● आधार नंबर आणि बँक खात्याची माहिती सुद्धा द्यावी लागेल.
● प्रवासी मजूर आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) वर नोंदणी करू शकतात.
● फोन नाही किंवा लिहिता वाचता येत नाही असे मजूर सीएससी केंद्रांवर जाऊन नोंदणी करू शकतात.
ई श्रम कार्ड मिळणार :
● मजूरांच्या युनिक अकाऊंट नंबरचे एक रजिस्ट्रेशन कार्ड बनवले जाईल.
ज्यास ई श्रम कार्ड नाव दिले आहे. असंघटित आणि प्रवासी मजूरांच्या डाटाबेसला आधारसोबत जोडले जाईल.
नॅशनल टोल फ्री नंबर जारी होणार : कोट्यवधी कामगारांच्या सुविधेसाठी सरकार एक नॅशनल टोल फ्री नंबर सुद्धा जारी केला जाणार आहे. मजूर या नंबरवर फोन करून पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक माहिती घेऊ शकतील.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup