Take a fresh look at your lifestyle.

आठ ‘अ’ ( 8अ ) चा उतारा काय असतो? त्याचा फायदा काय? जाणून घ्या!

0

विशेषतः ग्रामीण भागात सातबारा, नोंदी, आठ अ चा उतारा, मोजणी अशा गोष्टी नेहमी कानावर पडत असतात. परंतु याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळेच आज आपण आठ अ चा उतारा म्हणजे म्हणजे काय? तो कसा काढायचा? कसा वाचायचा? याची माहिती पाहणार आहोत…

आठ अ चा उतारा कसा वाचायचा? : ऑनलाईन आठ अ चा उतारा काढला तर तुम्हाला सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात वर्ष दिसेल. उजव्या कोपऱ्यात ज्या दिवशी उतारा काढला त्याची तारीख येते. त्यानंतर खाली डाव्या बाजूला गावाचे नाव, मध्यभागी तालुका आणि उजव्या बाजूला जिल्ह्याचे नाव असते.

त्याच्या खाली सात रकाने म्हणजेच कॉलम दिले आहेत ते कसे वाचायचे हे पाहूयात..
१) पहिला कॉलम : यात गाव नमुना सहामधील नोंद हा पहिला रकाना असतो. त्यामध्ये खातेदाराचा नोंद क्रमांक असतो. सदर क्षेत्र वैयक्तिक आहे किंवा सामायिक? याची नोंदणी असते. त्यामुळे आपल्याला जमिनीची मालकी व्यक्तिगत आहे किंवा सामायिक? हे देखील कळते.
२) दुसरा कॉलम : यामध्ये कॉलम किंवा रकान्यात भूमापन क्रमांक आणि उपविभाग क्रमांक असतो. त्यात खातेदाराचे नाव असते. सामायिक क्षेत्र असेल तर सगळ्यांची नावे असतात. या कॉलममध्ये त्या व्यक्तीच्या नावावर किती आहे? ते कोणकोणत्या गटात आहे? हे कळते.
३) तिसरा कॉलम : यामध्ये किंवा रकान्यात त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात किती क्षेत्र आहे? हे कळते.
४) चौथा कॉलम : हा आकारणी किंवा जुडीचा असतो. यामध्ये प्रत्येक जमीनीवर किती कर लावलेला आहे? हे कळते. हा कर रुपये आणि पैशात असतो (उदा. १०. ५०रुपये) यातून आपल्याला त्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या गटातील जमीनीवर किती कर आकारला? हे देखील कळते.
५) पाचवा कॉलम : हा कॉलम दुमला जमिनीवरील नुकसानीचा असतो.
६) सहावा कॉलम : हा स्थानिक करांचा कॉलम असून याचे दोन उपप्रकार आहेत. सहा (अ) मध्ये जिल्हापरिषदेने जमीनीवर किती कर लावला आहे? हे समजते. सहा (ब) मध्ये ग्रामपंचायतीने किती कर लावला आहे? हे कळते.
७) सातवा कॉलम : या कॉलममध्ये एकूण करांची बेरीज असते. यातून त्या व्यक्तीला किती कर भरावा लागतो? हे कळते.
सर्वात शेवटी व्यक्तीचे एकूण क्षेत्र, एकूण कर आकारणी याची माहिती दिलेली असते.

नवीन ७/१२ कसा आहे?| ७/१२ मध्ये नवीन झालेले बदल | नवीन ऑनलाईन ७/१२ चा शेतकऱ्यांना काय फायदा ?

आठ अ चा नक्की फायदा काय? :
● एकाच मालकाची वेगवेळ्यात गटात असलेली एकूण जमीन किती आहे? हे कळते.
● प्रशासनाला कर गोळा करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
● जमिनीची खरेदी-विक्री करताना जमीन घेणाऱ्याला माणसाला ती जमीन नक्की कुणाच्या नावावर आहे? याची माहिती मिळते.

आठ अ चा उतारा कसा मिळवायचा? :
● सर्वप्रथम https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जा.
● विभाग निवडा.
● आता आठ अ वर क्लिक करा.
● त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गावावर क्लिक करा.
● खाते नंबर क्लिक करून तो छोट्या बॉक्समध्ये लिहा.
● त्यानंतर शोध म्हणजेच सर्चवर क्लिक करून आठ अ चा उतारा मिळतो.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.