Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील मल्चिंग पेपरचे गाव, आधी दुष्काळग्रस्त, आता बागायती

0

आपल्या देशात अनेक ठिकाणी पाण्याची मोठी टंचाई आहे. यामुळे पाणी बचतीबाबत अनेक उपाययोजना केल्या जातात. असे असताना आता पाण्याची काटकसर कशी करावी हे खऱ्या अर्थाने मल्चिंग पेपरचे गाव बनू पाहणाऱ्या संगमनेर ( sangamner ) तालुक्यातील सावरगाव तळ या गावाने खऱ्या अर्थाने दाखवून दिले आहे. यामुळे या गावाची चर्चा सुरू आहे.

यामुळे इतर गावांपुढे पाणी बचतीचा एक आदर्श या गावाने निर्माण केला आहे. Mulching paper मल्चिंग पेपरवर पिक घेतल्याने पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून पाणी फाउंडेशनच्या ( Paani Foundation ) फार्म कप या स्पर्धेत या सावरगाव तळ गावाने सहभाग घेतला आहे.

यामुळे शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशन व विविध कृषी विद्यापीठच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे सावरगाव तळ मल्चिंग पेपरचे गाव बनले आहे. या गावातील शेतकरी टोमॅटो, कांदा, फ्लाॅवर, मिरची, वांगे, घेवडा यासारखी विविध भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात मल्चिंग पेपरद्वारे घेत आहेत. आता संपूर्ण गावच मल्चिंग पेपरवर पिक घेवू लागल्याचे पाहावयास मिळत आहे.

डोंगरदर्‍यांत असलेले सावरगाव तळ हे गाव पूर्वी दुष्काळी म्हणून भाग म्हणून पाहिले जात होते. मात्र, येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन थेट नदीवरून पाईपलाईनव्दारे पाणी आणले आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची प्रगती झाली. यामुळे अनेक पिके याठिकाणी आता घेतली जातात.

यामुळे गवताचा बंदोबस्तही चांगल्या पद्धतीने करता येतो. कीडजन्य व बुरशी रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमीन भुसभुशीत राहते. खते औषधे यांचीही बचत होते. असे अनेक फायदे मल्चिंग पेपरमुळे होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.