Take a fresh look at your lifestyle.

झोपताना स्मार्टफोन वापरताय? सावधान, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

0

स्मार्टफोन आता तरुणाईसोबतच सर्वांचाच जणू ‘ऑक्‍सिजन’ झालाय. मात्र स्मार्टफोनचे हे वाढते व्यसन यूजरच्या अंगलट आल्याचे एका संशोधनात दिसून आले आहे. या संशोधानुसार रात्री स्मार्टफोनचा वापर केल्याने अनेक दुष्परिणामाला सामोरे जावे लागते. काय आहेत हे दुष्परिणाम जाणून घेऊयात…

वजन वाढते_ : झोपताना स्मार्टफोनचा जास्त वापर केल्यास मेटाबॉलिजम प्रोसेसवर परिणाम होतो व या प्रक्रियेमुळे शरीराचे वजन वाढते.

मेंदू थकतो : झोपताना स्मार्टफोनचा वापर करत असाल तर यामुळे तुमचा मेंदू थकतो. मग यामुळे तुम्ही कोणतीही समस्या सोडवू शकत नाहीत.

मेमरी लॉस : झोपताना स्मार्टफोनचा वापर केल्याने मेंदूला अतिरिक्त मेहनत करावी लागते व यामुळे मेमरी लॉसचा धोका उद्भवू शकतो.

डोळ्यांवर परिणाम_ : अंधारात मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर जास्त प्रेशर पडतो. यामुळे डोळे लाल आणि कुमकुवत होतात.

एकाग्रता कमी होतो_ : झोपताना स्मार्टफोनचा वापर केल्याने फोकस कमी होतो. यामुळे एकाग्रता राहत नाही व सोबतच ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.

महत्वाच्या बातम्या : कोंडा काही मिनिटांत होईल गायब, नक्की वाचा रामबाण उपाय

झोपमोड होते : फोन जवळ घेऊन झोपले तर फोनच्या नोटिफिकेशन आणि व्हायब्रेशनमुळे झोपमोड होते व झोप पूर्ण न झाल्याने परिणामी चिडचिडेपणा वाढतो.

इतर समस्या : तुमच्या फोनमधून विषारी वायू बाहेर निघत असतो. यामुळे डोळे, त्वचा आणि नाकात जळजळ होण्यासारख्या समस्या निर्माण होतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues