Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Usain Bolt : जगातील सर्वात वेगवान खेळाडू अवघ्या काही क्षणात झाला कंगाल; आयुष्यभर कमवलेले पैसा काही मिनिटात झाली गायब

0

क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून जमैकाचा प्रसिद्ध खेळाडू आणि वेगाचा बादशहा उसैन बोल्ट अवघ्या काही क्षणात कंगाल झाला आहे. उसैन बोल्टला मोठा आर्थिक फटका बसला असून त्याने आयुष्यभर कमवलेले जवळजवळ सर्व पैसे काही मिनिटात झाले चोरी.

नेमके प्रकरण काय?

‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ अशी कीर्ती असलेला धावपटू उसैन बोल्ट (Usain Bolt) अचानक कंगाल झालाय. त्याची आतापर्यंतची कमाई आणि रिटायरमेंटनंतर मिळालेला पैसा एका क्षणात गायब झाला आहे. लंडनपासून ते बिजिंग ऑलम्पिकपर्यंत उसैन बोल्ट यानं अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. जगातील सर्वात वेगवान धावपट्टू म्हणून बोल्टला ओळखलं जातं. याच बोल्टची संपत्ती एका क्षणात नाहीशी झाली आहे.

आजवर उसैन बोल्टने ऑलम्पिकमध्ये आठ वेळा गोल्ड पदकावर नाव कोरले आहे. तर त्यानं आतापर्यंत केलेली कमाई आणि निवृत्तीनंतर मिळाले पैसे एका झटक्यात फुर्रर्र झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बोल्टचे 98 कोटी रुपये गायब झाले आहेत. वकिलांनी त्यांना याबाबत गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

उसेन बोल्टच्या इनव्हेस्टमेंट खात्यावरुन तब्बल 98 कोटी रुपये गायब झाले आहेत. उसेन बोल्टचं हे खातं स्टॉक्स अँड सिक्योरिटीज लिमिटेड (SSL) कंपनीसोबत होतं.असोशिएएट प्रेसनुसार, ही जमैका येथील एक गुंतवणूक कंपनी आहे. या कंपनीला बोल्टच्या वकिलांनी पत्र पाठवत पैसे परत करण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, बोल्टच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा दिवसांच्या आतमध्ये कंपनीने पैसे माघारी केले नाहीत, तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.’ वकिलांनी कंपनीला आठ दिवसांचा वेळ दिला आहे. जर कंपनीने निर्धारित वेळेत पैसे माघारी दिले नाहीत, तर बोल्ट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews