Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Untimely Rain : अवकाळी पाऊस आला तर फळबागा आणि भाजीपाला पिकांची कशी काळजी घ्याल?

0

Untimely Rain हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडयात रविवारी 11 किंवा सोमवारी 12 डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर मंगळवारी 13 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रविवारी 11 डिसेंबर रोजी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर सोमवारी 12 डिसेंबर रोजी जालना व औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वरील शक्यतांचा विचार केला आणि पाऊस आला तर ऐन थंडीच्या काळात शेतकऱ्याने करावे तरी काय? असा सवाला उपस्थित होतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमची तज्ञांची टिम फळबागा आणि भाजीपाला पिकांची कशी काळजी घ्यावी? या विषयी मार्गदर्शन करत आहे. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Untimely Rain संत्रा/मोसंबी : बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करा. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 टक्के 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करा. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे कोरड्या हवामानात फवारणी करा. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करा. तसेच आवश्‍यकता असेल तर दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करा.

हेही वाचा : बातमी कामाची! शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना आता मिळणार ‘इतके’ अनुदान

Untimely Rain डाळींब : या बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करा. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग ग्रस्त फांद्या काढून नष्ट करा. तसेच बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करा.

चिकू : तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करा.

Untimely Rain द्राक्ष : या बागेमध्ये ब्लोअर फिरवून द्राक्ष गुच्छांमध्ये साठलेले पाणी निघून जाईल याची काळजी घ्या. गुच्छातील पाणी काढून टाकण्यासाठी फलोत्पादन ग्रेडच्या खनिज तेलाचा (मिनरल ऑईल) चा वापर करा.

Untimely Rain भाजीपाला : या पिकांत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करा. तसेच आवश्यकतेनूसार पाणी द्या. मागील काही दिवसांत ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5टक्के + फेनप्रोपाथ्रीन 15टक्के 10 मीली किंवा डायमेथोएट 30टक्के 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून कोरड्या हवामानात फवारणी करा. तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या भाजीपाल्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews