Take a fresh look at your lifestyle.

Krushidoot News : बापरे! एकीकडे बेरोजगारी संपेना अन् इथे उंदीर पकडण्याचे मिळतात 1 कोटीहून अधिक पगार

0

Krushidoot News सध्याच्या काळात संपूर्ण जगभरात नोकरी मिळणं हे फार अवघड झालं आहे. अर्थात तुम्हाला देखील माहिती आहे कि त्यामागे अनेक कारणं आहेत. परंतु जगभरात कोरोना महामारीनंतर अनेक जणांवर बरोजगरीचे संकट आले आहे. मात्र, सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये स्थानिक प्रशासनाकडून एका अनोख्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला वर्षाला 1.3 कोटी रुपये पगार दिला जाणार असून या पदावरील व्यक्तीला 24 तास काम करावं लागणार आहे.

नेमके प्रकरण काय?

Krushidoot News अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये सध्या उंदरांनी उच्छाद मांडला असून त्यामुळे तेथील नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. त्यामुळे तेथील प्रशासनाने उंदीर पकडण्याचं अभियान सुरू केलं आहे. तुम्हाला जर उंदरांची किळस वाटत असेल, किंवा तुम्हाला ते आवडत नसतील तरी हरकत नाही. पण तुमचे संवाद कौशल्य चांगलं असेल आणि स्वभाव खोडकर आणि नीच असेल तर या गुणांमुळे तुम्हाला तब्बल 1.3 कोटी रुपये पगार मिळू शकतो. सध्या न्यूयॉर्क शहरात उंदरांची मोठी दहशत आहे. त्यामुळे तेथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे या शहरात रॅट जार या पदासाठी भरती केली जाणार आहे.

Krushidoot News या पदासाठी अधिकृत जॉब टायटल डायरेक्टर ऑफ रोडेंट मिटिगेशन म्हणजे उंदीर नियंत्रण संचालक असं आहे. या नोकरीला रॅट जार असंही नाव देण्यात आलं आहे. या पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवाराला 1,20,000 ते 1,70,000 डॉलर म्हणजेच 97 लाख ते 1.3 कोटी रुपये वर्षिक पगार मिळणार आहे.

हेही वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय! फेरीवाले अन् हातगाडीवाल्यांनाही आता मिळणार रोजगार

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues