Tur Rate : यंदा तुरीचा बाजारभाव काय असेल ? कसे असतील तुरीचे भाव ?
Tur Rate यंदा देशात तुरीचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरात चढउतार सुरु आहेत.
ज्वारीच्या दरात वाढ : Jowar Rate
मागील हंगामात देशात ज्वारीचं उत्पादन घटलं होतं. त्यातच यंदा परतीच्या पावसामुळं पेरण्यांना उशीर झाला. त्यामुळं रब्बी ज्वारीचा पेरा कमी होण्याचा अंदाज आहे. या कारणांनी ज्वारीच्या दरात मोठी तेजी आली. दरवाढीच्या अपेक्षेने स्टाॅकिस्ट ज्वारीचा साठा हळूहळू बाहेर काढत आहेत. सध्या देशात ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार ६०० रुपये दर मिळतोय. ज्वारीचा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. Tur Rate
सोयाबीनचे दर स्थिर : Soyabean Rate
सध्या सोयाबीन दर टिकून आहेत. मात्र काही बाजारांमध्ये दर क्विंटलमागे १०० रुपयाने घसरले होते. आज देशात सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होता. तर कमाल दर ६१०० रुपयांचा होता. सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून याच दरपातळीवर स्थिर आहेत. तर दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवलं आहे. जागतिक सोयाबीन बाजाराची स्थिती पहता दर ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज आहे.
- Copper Deficiency in Plants : वनस्पतींमध्ये तांब्याच्या कमतरतेचा काय परिणाम होतो, त्याच्या पुरवठ्याची पद्धत जाणून घ्या
- Namo Shetkari Yojana | बाप्पाच्या आगमनापूर्वीचं बळीराजा सुखावणार; ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार, वाचा सविस्तर माहिती
- Suicide Prevention Day : भारतामध्ये आत्महत्यांचे सर्वांत जास्त प्रमाण; वाचा सविस्तर आत्महत्येचे कारण आणि प्रमाण..
वांग्याचे भाव ओसरले : Brinjal market rate
सध्या अनेक बाजारांमध्ये आता वांग्याची आवक वाढत आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि नाशिक बाजारांमध्ये वांग्याची आवक चांगली होत आहे. त्यामुळं वांग्याचे दर काहीसे नरमले आहेत. मात्र तरीही अनेक बाजारात वांग्याला चांगला दर मिळतोय. सध्या राज्यात वांग्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. आवक वाढल्यानंतर वांग्याचे दर दबावात येऊ शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
हरभराचे भाव स्थिरच :
मागील वर्षभर हरभरा दर दबावात आहेत. शेतकऱ्यांना क्विंटलमागं जवळपास ८०० रुपये कमी कमतीने हरभरा विकावा लागला. आजही बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. सध्या दर कमी असल्यानं हरभरा पेरणीवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
तुरीचा बाजार कसा राहील ? Tur rate
देशात सध्या तुरीचे दर (Tur Rate) वाढत असल्याने सरकारची दर कमी करण्यासाठी कसरत सुरु आहे. सरकारने तुरीचा पुरवठा (Tur Supply) वाढवण्यासाठी मार्च २०२३ पर्यंत मुक्त आयातीला परवानगी दिली. केंद्राने यंदा देशात जवळपास ३९ लाख टन तूर उत्पादनाचा (Tur Production) अंदाज जाहीर केला. पण देशातील उत्पादन यापेक्षा कितीतरी प्रमाणात कमी असेल, असं उद्योग आणि व्यापारी सांगत आहेत. सध्या आफ्रिकेतील देशांमध्ये नवी तूर बाजारात येत आहे. त्यामुळं आयात वाढण्याचा अंदाज आहे.
सध्या तुरीला सरासरी ७ हजार २०० ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तुरीला फार उठाव नसला तरी देशातील लग्न सराईचा हंगाम सुरु झाला. या काळात तुरीच्या डाळीला मागणी वाढते. त्यामुळं भविष्यात आयात वाढली तरी दरात मोठी तेजी अपेक्षित नसली तरी घट होण्याची शक्यता नाही. यंदा गेल्यावर्षीप्रमाणं विक्रमी आयात झाली तरी देशातील उत्पादन कमी राहणार आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup