Take a fresh look at your lifestyle.

Tur Cultivation तूर लागवड विषयी महत्वाची माहिती!

0

Tur Cultivation गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाची ये-जा सुरु आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग खऱ्या अर्थाने सुरू झालीय. दरम्यान कपाशी, सोयाबीन तसेच तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आहे. आज आपण तुरीची लागवड करणाऱ्यांसाठी सर्व माहिती घेऊन आलो आहेत. यामध्ये आपण तुर लागवड कधी, कशी करावी? बीजप्रक्रिया, बियाणांची निवड याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

Tur Cultivation चांगल्या पावसाचा अंदाज घेऊन जमिनीत वाफसा येताच जून महिन्याचा दुसरा आठवडा ते जुलैचा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करायला हरकत नाही. जर उशिरा लागवड झाली तर लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा कालावधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्याही कमी राहते आणि उत्पादनात घट येते.

Tur Cultivation आय.सी.पी.एल.-८७ या लवकर तयार होणाऱ्या जातीची ४५ x १० सें.मी. अंतरावर लागवड करा. तसेच मध्यम कालावधीतील जातींची ६० x २० सेंमी किंवा ९० x २० सें.मी. अंतरावर लागवड करा.

Tur Cultivation असे ठेवा बियाण्यांचे प्रमाण :
● आय.सी.पी.एल.-८७ जात : एकरी ७ ते ८ किलो बियाणे
● मध्यम कालावधी राजेश्वरी, विपुला आणि बी.डी.एन.-७११ जात : एकरी ५ ते ६ किलो बियाणे
● उशिरा येणारी आणि जास्त अंतरावरील जात : एकरी २ ते २.५ किलो बियाणे

Tur Cultivation अशी करा बीजप्रक्रिया :

प्रथमतः प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करा. त्यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम व पी.एस.बी. जिवाणू संवर्धन प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून प्रक्रिया करा.

जर आपणांस वरील माहिती फायद्याची वाटत असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues