Take a fresh look at your lifestyle.

लाखोंची कमाई देणारी ‘तुळशीची शेती’ करा!

0

नवीन व्यवसाय करायचा डोक्यात असेल आणि काही सुचत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी व्यवसायाची एक भन्नाट कल्पना घेऊन आलोय. हा व्यवसाय आहे तुळशी पीक शेतीचा. तर चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर…

तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आढळतात. तुळशी एक अशी औषधी वनस्पती ज्याचा प्रत्येक एक भाग उपयोगी असतो. घरेलू उपचारपद्धतीत, आयुर्वेदिक, होमियोपॅथी,एलोपाथिक, युनानी औषधंच्या निर्मितीसाठी देखील तुळशीचा वापर होतो. याच कारणास्तव बाजारात तुळशीला मागणी असते. म्हणून या तुळशीच्या शेतीतून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.

कोरोना संकटामुळे आयुर्वेदिक औषधांकडे लोकांचे आकर्षण वाढलेय. यामुळेच आज तुळशीला बाजारात मोठी मागणी आहे. आजघडीला अगरबत्तीसह अनेक धार्मिक प्रॉडक्टच्या उत्पादनात तुळशीचा वापर होतो. यामुळेच तुळशीचा वापर जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे.

तीन लाखापर्यंत कमाई : तुळशीची लागवड अगदी सोपी असून खर्च आणि शारीरिक श्रम दोन्हीही कमी आहेत. तुम्ही कोणत्याही कंपनीशी करार करून तुळशीची लागवड करू शकता. त्याचा लागवड खर्च प्रति एकर 15 हजार रुपये आहे. यातून अवघ्या तीन महिन्यांत सरासरी 3 लाख रुपये मिळू शकतात. सध्या वैद्यनाथ, डाबर, पतंजली या कंपन्या तुळशीच्या लागवडीसाठी बाजारात करार करीत आहेत. अशाप्रकारे तुळशी पीक लावून तुम्ही दरमहा 30 हजार रुपये उत्पन्न कमवू शकता.

लागवडीची योग्य वेळ : तुळशी लागवडीची योग्य वेळ म्हणजे जुलै महिना होय. याकालावधीमध्ये तुळशीच्या वनस्पतींचे रोपण करा. तसेच जास्त उत्पादनासाठी चांगल्या जातींची निवड करा. तुळशीचे आरआरएलओसी 12 वाण 45X45 सेमी अंतरावर लावा. आरआरएलओसीच्या 14 वाणांच्या लागवडीसाठी 50×50 सें.मी. अंतर ठेवा. झाडाची लागवड केल्यानंतर शेतात ओलावा नसेल तर ड्रीपने पाणी द्या. तसेच तुळशीच्या झाडांना आठवड्यातून एकदा आवश्यकतेनुसार पाणी द्या. पिकाची कापणी होण्यापूर्वी दहा दिवस आधी पिकाला पाणी देण्याचे थांबवा.

कापणीची योग्य वेळ काय? : हे पीक योग्य वेळी काढणे अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा पाने मोठी होतील तेव्हाच त्यांची कापणी करा. जेव्हा तुळशीच्या बीयांची वाढ होते तेव्हा तुळशीपासून मिळणाऱ्या तेलाचे उत्पादन कमी होते म्हणून कापणी वेळेवर करा. अशा परिस्थितीत जेव्हा पाने मोठी असतात तेव्हा त्यांची काढणी करा. कापणी 15 ते 20 सेमी उंचीपासून करा.

तुळशी विकणार कुठे? : तुम्ही पीक मार्केट एजंटांनाही (व्यापारी) विकू शकता. तसेच जवळपासच्या बाजारात आपला माल विकण्यासाठी विविध व्यापाऱ्याशी संपर्क साधा. तसेच, कॉन्ट्रॅक्ट शेती करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. याद्वारे पिकाची विक्री करण्यास त्रास होणार नाही.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues