Take a fresh look at your lifestyle.

ट्रायकोडर्मा – रोग नियंत्रक बुरशी

2

अलीकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा मित्रबुरशीचा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होवू लागला आहे. पिकावरील मुळ कुज (Wilt) व मर या रोगाचे नियंत्रण ट्रायकार्डमा बुरशीमुळे करता येते. मुख्यतः ट्रायकोडर्माच्या दोन प्रजाती वापरात आहेत. एक ट्रायकोडर्मा हरजीएनम (trichoderma harzianum) व दुसरी ट्रायकोडर्मा व्हिरीडी (trichoderma viride).

ट्रायकोडर्माची कार्यपध्दती :

सर्वप्रथम ट्रायकोडर्मा (Trichoderma) ही बुरशी हानिकारक बुरशीच्या धाग्यामध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरविते व त्यातील पोषक द्रव्ये शोषून फस्त करते. परिणामी अपायकारक बुरशीचा बंदोबस्त होतो. या बुरशीची वाढ जलद गतीने होते. त्यामुळे अन्नद्रव्य शोषणासाठी ही बुरशी अपायकारक बुरशींसोबत स्पर्धा करते. हानिकारक बुरशीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे कर्ब, नत्र, व्हिटॅमिन इत्यादीची कमतरता होऊन हानिकारक बुरशीचा नाश होतो. तसेच ट्रायकोडर्मा ग्यायोटॉक्झीन सारखी प्रती जैविके निर्माण करते. ट्रायकोडर्मा ही हानिकारक बुरशीच्या वाढीला मारक ठरते, ट्रायकोडर्मा बुरशीचे कवकतंतू पिकाच्या मुळावर पातळ थरात वाढतात व त्यामुळे हानिकारक बुरशीचे कवक तंतू झाडामध्ये मुळांद्वारे प्रवेश करू शकत नाही. त्याचप्रमाणे ट्रायकोडर्मा सूत्रकृमींपासून देखील पिकांच्या मुळाचे संरक्षण करते.

ट्रायकोडर्मा वापरण्याची पध्दतः

१ ) बीज प्रक्रिया : ट्रायकोडर्मा (Trichoderma) ही बुरशी वापरण्याची मुख्य पध्दत म्हणजे बीज प्रक्रिया पेरणीचे वेळी ४ ग्रॅम या प्रमाणात १ किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा (Trichoderma) पावडरची बीज प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखे थर होईल याची काळजी घ्यावी. बियाणे काही वेळ सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी.

२ ) माती प्रक्रिया – जमिनीमार्फत होणाऱ्या रोगजन्य बुरशीच्या नियंत्रणासाठी १ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा (Trichoderma) भुकटी २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिश्रण करून एक हेक्टर क्षेत्रात पसरवून मातीत मिसळावे व शक्य असल्यास पाणी द्यावे.

ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे :

नैसर्गिक घटक असल्यामुळे ही बुरशी पर्यावरण पूरक आहे. त्यामुळे या बुरशीचा मानव, पशु तसेच पर्यावरणावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही.
मातीतील सेंद्रीय घटक कुजवून देण्यास तसेच जमिनीचा पोत सुधारण्यात मदत होते.
बीज प्रक्रिया केल्याने उगवण शक्ती वाढवून बीज अंकुरण क्षमता २५-३० टक्क्यांनी वाढवते.
हानिकारक/रोगकारक बुरशीचा नायनाट करते .
पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
किफायतशीत असल्याने खर्च कमी होतो.
पिकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता (AntiBodies) वाढवून इतर रोगांपासून पिकांचे संरक्षण करते.

वापरताना घ्यावयाची काळजी :

ट्रायकोडर्माची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शेतातील जमिनीमध्ये सेंद्रिय घटकांची उपलब्ब्धता जास्त असावी
ट्रायकोडर्माचा वापर केल्यानंतर ६-१० दिवसापर्यंत रासायनिक खते व बुरशीनाशके यांचा वापर टाळावा.
ट्रायकोडर्माच्या उत्तम वाढीसाठी व कार्यक्षमतेसाठी ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक आहे.

आकाश राजेंद्र जाधव
(B.Sc. Agriculture)
मो. 80553 15387

2 Comments
  1. संतोष तारडे says

    मस्त माहिती 👌

  2. Vaibhav says

    Nice information bro

Leave A Reply

Your email address will not be published.