Take a fresh look at your lifestyle.

Tourism : विदेशात फिरायला जायचंय? मग जाणून घ्या जगातील सर्वात चांगले डेस्टिनेशन

0

Tourism : विदेशात फिरायला जायचंय? मग जाणून घ्या जगातील सर्वात चांगले डेस्टिनेशन

ज्‍यांना विदेशात फिरायला आवडते, त्‍यांच्‍यासाठी सर्वात चांगले डेस्टिनेशन म्‍हणजे स्विर्त्‍झलँड. या देशाला पृथ्‍वीवरील स्‍वर्ग म्‍हटले जाते. भारतातूनही मोठ्या संख्‍येने पर्यटक या देशात फिरण्यासाठी जातात. भारत आणि स्विर्त्‍झलँडमध्‍ये किमान 7 हजार किमी एवढे अंतर आहे. बर्न ही या शहराची राजधानी आहे. जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि रोमन या येथील राजभाषा आहे. स्विर्त्‍झलँडच्‍या आसपास फ्रान्‍स, जर्मनी, इटली आणि स्‍पेन हे देश आहेत. स्‍पेनमध्‍ये अनेक विलोभनीय स्‍थळे आहेत. जाणुन घेऊयात स्विर्त्‍झलँडमधील 5 अशी वैशिष्‍टये जे तुम्हाला भविष्यात मदत करतील..

स्विर्त्‍झलँडची 5 वैशिष्‍टये

स्विर्त्‍झलँडमध्‍ये फिरण्‍यासाठी कार अगदी सहजतेने भाड्याने मिळते. तुम्‍ही स्विर्त्‍झलँडमध्‍ये बोट, कार किंवा ट्रेनने अगदी सहज कुठेही प्रवास करु शकतात.

येथील अतिशय उंच अशा हिमशिखरावर पर्यटकांसाठी सयर्व सुखसुविधा करण्‍यात आल्‍या आहेत.

स्विर्त्‍झलँडची सर्वात खास बाब म्‍हणजे जेवढी सौंदर्याची उधळण येथे निसर्गाने केली आहे, तेवढीच काळजी येथील सरकारही घेते. त्यामुळे तुम्‍हाला अनेक सौंदर्यस्‍थळे अगदी जवळून पाहता येतात.

स्विर्त्‍झलँडमध्‍ये तुम्‍ही केव्‍हाही जाऊ शकता. तरीही हिवाळ्यात येथे जाणे टाळले पाहिजे. कारण या दरम्‍यान थंडी प्रचंड असते. तुम्ही सर्व ठिकाणांना भेटी देऊ शकणार नाहीत.

भारतातून स्विर्त्‍झलँडला जाण्‍यासाठी अनेक वेबसाईटवर 1 लाख 9 हजार रुपयांपासून 2 लाख 30 हजारापर्यंतचे पॅकेज उपलब्‍ध आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues