
Top 5 best batsman : रोहित शर्मा, विराट कोहलीला मागे टाकत या भारतीय फलंदाजाने 2022 मध्ये केल्या सर्वाधिक धावा
भारताने बांगलादेशविरुद्धची (india vs bangladesh) कसोटी मालिका 2-0 अशा फरकाने जिंकत भारताने आपला शेवट गोड केला आहे. भारतच यंदाच्या वर्षातील 2022 मधील हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. भारतीय संघाने 2022 ची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्याने पासून केली होती. भारतीय क्रिकेट संघाचा या वर्षातील प्रवास थोडा निराशादायक होता. कारण भारतीय संघ यंदा आशिया कप आणि टी-20 विश्वचषक दोन्ही जिंकू शकला नाही. परंतु या वर्षात अनेक युवा खेळाडूंनी संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. या वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज (Top 5 best betsman) कोण होते आणि त्यांनी किती धावा केल्या आहेत. सविस्तर जाणून घेऊया.
1) श्रेयस अय्यर : मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरसाठी यंदाचे वर्ष हे अत्यंत चांगले असल्याचे बोलले जात आहे. अय्यरने 2022 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या असून अय्यरने 39 सामन्यांच्या 40 डावांमध्ये 48.75 च्या सरासरीने एकूण 1609 धावा केल्या आहेत.
2) सूर्यकुमार यादव : सूर्यकुमार यादवसाठी 2022 हे वर्ष संस्मरणीय ठरले, त्याने केवळ टी-20 सामन्यांमध्ये 1164 पेक्षा जास्त धावा केल्या. तर त्याने यावर्षी भारतासाठी 43 डावांत 1424 धावा काढल्या आहेत.
3) ऋषभ पंत : काही सामने सोडले तर भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत मर्यादित षटकांच्या मालिकेत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. यानंतरही सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. पंतने या वर्षात 43 डावांत 37 च्या सरासरीने आणि 101 च्या स्ट्राईक रेटने 1380 धावा काढल्या आहेत.
4) विराट कोहली : मागील दोन वर्षांपासून शतकाची वाट पाहणाऱ्या कोहलीने अखेर यंदाच्या वर्षातील आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. पण कसोटीत त्याच्या बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या नाहीत. तरी देखील तोच सर्वाधिक धाव करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने यंदा आपल्या 37 सामन्यांत 38.51 च्या सरासरीने 1348 धावा केल्या. तो यंदाच्या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही होता.
5) रोहित शर्मा : कर्णधार रोहित शर्मासाठी हे वर्ष अडचणींनी भरलेले होते. 2014 नंतर पहिलेच वर्ष रोहितसाठी असे होते जेव्हा रोहितच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले नाही. त्याने या वर्षात 39 सामन्यांच्या 40 डावांत 995 धावा केल्या. त्यात 6 अर्धशतकांचा समावेश होता.
हेही वाचा :
- या विभागात 13000 हून अधिक पदांसाठी मेगा भरती; अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक..
- मुलं खूप Tv बघतात? मुलाचं टीव्ही पाहणं कसं थांबवायचं? हे उपाय करून बघा