Take a fresh look at your lifestyle.

Toll On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवास करण्याचा विचार करताय? मग तुम्हाला भरावा लागणार ‘इतका’ टोल

0

Toll On Samruddhi Mahamarg राज्यातील बहुचर्चित मार्ग म्हणजे अर्थातच हिंदुहृदयसम्राट ‘बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं’ (samruddhi mahamarg) उद्घाटन 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग असून पहिल्या टप्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत हा मार्ग सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. हा मार्ग 10 जिल्ह्यांतील 392 गावांमधून धावणार असून यामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ साधारण सात तासांपर्यंत कमी करणार आहे. मात्र, या मार्गावर तुम्ही प्रवास करण्याचं विचार करणार असाल तर तुम्हाला या मार्गवर टोल(toll) भरावा लागणार आहे. तर चला तर मग जाणून घेऊया या मार्गावर किती टोल भरवा लागणार आहे.

Toll On Samruddhi Mahamarg वाहनांचा प्रकार आणि त्यासाठीचा लागणार टोल…(samruddhi mahamarg)
▪️ मोटर, जीप, व्हॅन अथवा हलकी मोटर वाहने (Motor, Jeep, Van or Light Motor) – 1.73 रुपये प्रतीकिमी
▪️ हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस (Light commercial vehicles, light goods vehicles or mini buses) – 2.79 रुपये प्रतिकिमी
▪️ बस अथवा ट्रक (Bus) – 5.85 रुपये प्रतिकिमी
▪️ तीन आसांची व्यावसायिक वाहने (Riksh) – 6.38 रुपये प्रतिकिमी
▪️ अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांची वाहने – 9.18 रुपये प्रतिकिमी
▪️ अतिअवजड वाहने (सात किंवा जास्त आसांची) – 11.17 रुपये प्रतिकिमी

मिळालेल्या माहितीनुसार, (samruddhi mahamarg) या महामार्गावर टोलसाठी नवी प्रणाली लावण्यात आली असून यामार्गावर तुम्ही जितका प्रवास करणार, तितकाच टोल तुमच्याकडून घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे उदाहरण नागपूर ते शिर्डी पर्यंतचे 520 km अंतराकरिता तुम्हाला साधारण 900 रुपये टोल भरावा लागणार आहे. तर मुंबई पर्यंतच्या 701 किमीच्या प्रवासासाठी साधारण पणे बाराशे रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.

दरम्यान, टोलचे हे दर पुढील तीन वर्षापर्यंत म्हणजे 31 मार्च 2025 (31 march ) पर्यंत लागू असतील त्यानंतर यामध्ये ठराविक टक्के वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues