Take a fresh look at your lifestyle.

Sport Update : आजपासून टीम इंडियाचे मिशन वर्ल्डकप! काही वेळातच रंगणार भारत व श्रीलंकेचा वनडे सामना

0

श्रीलंकेविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ पूर्ण जोमाने उतरणार आहे. एकीकडे सिनियर खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे फलंदाजी बाजू आधीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. तर दुसरीकडे मोहम्मद शमीच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी बाजू प्रभावी होणार असल्याचे सांगण्यात येते.

भारतीय संघाचा टी20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर आता एकदिवसीय मालिका जिंकण्याचा दोनीही संघाचा हेतू आहे. त्यात आगामी ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये होणा-या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीनेही हा सामना महत्त्वाचा असल्याने सर्वांचे लक्ष या सामन्याकडे असणार आहे. तर भारतीय संघाला विश्‍वचषकापूर्वी 10 महिन्‍यात 15 सामने खेळायचे आहेत. सोबतच उर्वरित वेळात भारतीय संघाला या समतोल राखण्याबरोबरच, आयपीएल, काही देशांसोबत T20 देखील खेळाच्या आहेत.

आजचा भारत विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटीच्या बरसापरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून हा सामना घरबसल्या तुम्ही कुठे पाहू शकता व कसा असेल दोनीही संभाव्य संघ जाणून घेऊया..

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.

भारताचा एकदिवसीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ:

दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, कासून, महाराणी, महाराणी, नुवानिंदू फर्नांडो, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.

हेही वाचा :- भारत-श्रीलंका वनडेसाठी ‘या’ सरकारची जय्यत तयारी, क्रिकेटप्रेमींना थेट हाफ डे सुट्टी जाहीर!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues