Take a fresh look at your lifestyle.

Share Market Update : आज 2022 वर्षातील शेवटचा ट्रेडिंग दिवस, गुंतवणूकदारांनो जाणून घ्या आजची मार्केटची परिस्थिती

0

2022 वर्षाच्या शेवटच्या वायपर दिवशी भारतीय शेअर बाजाराची (share market) तेजीत सुरुवात झाली आहे. अनेक जागतिक संकेतांमुळे आज सकाळ पासूनच भारतीय शेअर बाजारात हिरवळ दिसून दिली आहे. आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 195 अंकांची उसळी घेऊन 61,329 अंकांवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टीने 57 अंकांनी वाढून 18,248 अंकांवर व्यापाराची सुरुवात झाली. (Today’s share market update)

आज भारतीय बाजारात एफएमसीजी वगळता इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसातील आतापर्यंत कोणते शेअर्स तेजीत आहेत व कोणते शेअर्स मध्ये घसरण झाली आहे..

आज कोणते शेअर्स आहेत तेजीत :
बजाज फायनान्स 2.18 टक्के, बजाज फिनसर्व्ह 2.03 टक्के, टाटा स्टील 1.43 टक्के, एसबीआय 1.22 टक्के, विप्रो 1.13 टक्के, टाटा मोटर्स 1.06 टक्के, टेक महिंद्रा 0.93 टक्के, टायटन कंपनी 0.69 टक्के आणि कोटक महिंद्रा बँक 0.63 टक्‍क्‍यांनी वाढून सकाळच्या व्यापार सत्रात तेजीत व्यवहार करत आहेत.

आज सकाळच्या सत्रात घसणारे स्टॉक्स :
एशियन पेंट्स 00.56 टक्के, एचडीएफसी बँक 0.41 टक्के, भारती एअरटेल 0.28 टक्के, महिंद्रा 0.25 टक्के, इंडसइंड बँक 0.25 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.24 टक्के, आयटीसी 0.15 टक्के, नेस्ले 0.15 टक्के, सन फार्मा 0.11 टक्के, आणि HDFC 0.09 टक्क्यांनी घसरून लाल रंगात व्यवहार करत होते.

दरम्यान, आंतराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर अमेरिकन शेअर बाजार काल म्हणजे गुरुवारी मोठ्या तेजीसह बंद झाला असून त्यामुळे आज आशियाई शेअर बाजारात तेजी दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues