Take a fresh look at your lifestyle.

Tiny Hole At Smartphone : तुमचा स्मार्टफोनच्या खालील बाजूस ‘हे’ लहान होल का असते? जाणून घ्या त्याचे महत्त्व

0

आजकाल प्रत्येकाच्या हातात एक गोष्ट कायम असते ती म्हणजे स्मार्टफोन. प्रवास असो किंवा कामातून काढलेला ब्रेक प्रत्येक जण सतत स्मार्टफोनमध्ये व्यग्र असतो. यामागचे कारणही तसेच आहे. स्मार्टफोनमुळे दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी सहजरित्या एका क्लिकवर करता येतात. सध्याचा काळ हा डिजिटल युग म्हणून ओळखलं जातं. आताच्या काळात प्रत्येक गोष्टींसाठी गॅझेट उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक काम करण्यासाठी आपण स्मार्टफोनचा आधार घेतला जातो. पण दिवसातला बराच वेळ आपण ज्या फोनवर घालवतो त्यातील काही फीचर्स किंवा त्यावर असणाऱ्या विविध टॅब्सचा वापर कशासाठी होतो हे बऱ्याच वेळा माहीत नसते. यातीलच एक गोष्ट म्हणजे बहुतांश स्मार्टफोनच्या खालच्या बाजुला असणारा लहान होल. आज आपण या लेखात स्मार्टफोनच्या खालील बाजूस ‘हे’ लहान होल का असते? (Tiny Hole At Smartphone) हे जाणून घेऊया…

बहुतांश स्मार्टफोनच्या खालच्या बाजुला चार्जिंग कनेक्शन जोडण्याच्या शेजारी एक लहान होल असतो. बऱ्याच वेळा तो फोनच्या डिझाईनचा एक भाग असेल असे गृहीत धरून, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण हा लहान होल फोनच्या डिझाईनचा भाग नसुन एका महत्त्वाच्या कारणासाठी त्या जागी असतो.

आपण जेव्हा फोनवर बोलत असतो तेव्हा हा लहान होल महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हा होल आपण फोनवर बोलत असताना आपल्या आजूबाजूला असणारा आवाज कॅन्सल करण्याचे काम करतो. म्हणजे जेव्हा आपण फोनवर बोलतो तेव्हा आपल्या आवाजासोबत आजूबाजूचा आवाज देखील समोरच्या व्यक्तीला ऐकू जाण्याची शक्यता असते. पण या लहान होलमुळे आपल्या व्यतिरिक्त दुसरा आवाज पोहचत नाही.

दरम्यान, या होलला ‘नॉइस कॅन्सलेशन माइक्रोफोन’ म्हटले जाते. फोनवर बोलत असताना हे ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होते. तुम्ही खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी जरी असला तरी या नॉइस कॅन्सलेशन माइक्रोफोनमुळे आजूबाजूचा आवाज कॅन्सल होऊन फक्त तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत क्लिअर पोहोचण्यास मदत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues