Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना सावकारांपासून वाचवण्यासाठी ‘या’ बँकेचा पुढाकार!

0

सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांना सातत्याने विविध संकटांना वारंवार सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ येते. परंतु, बँकेच्या निकष पाहता ते कर्जासाठी पात्र ठरत नाहीत. मग नाईलाजाने सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते.

या पार्श्वभूमीवर पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरु केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध होणार आहे. पीएनबी बँक फार्महाऊस, फळबागेची खरेदी, शेतीच्या कामांसाठी लागणारी वाहने आणि डेअरीच्या विकासासाठी कर्ज देणार आहे.

किती कर्ज मिळणार? : या माध्यमातून लहान शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. लहान शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्ज जाईल. हे कर्ज फेडण्यासाठी 5 ते 7 वर्षांचा अवधी दिला जाईल.

कर्जासाठी असा करा अर्ज :

● पीएनबी बँकेच्या ऑनलाईन पोर्टलवर जा. त्यानंतर लोनचा पर्याय निवडा.
● त्यानंतर Agriculture loan new application वर क्लिक करा.
● समोर आलेल्या फॉर्ममध्ये सर्व तपशील भरा.
● यानंतर फॉर्म सबमिट करा.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues