Take a fresh look at your lifestyle.

Bricks : …म्हणून घर बांधतांना वापरण्यात येणाऱ्या विटेचा रंग ‘हा’ लाल असतो

0

आपल्या पैकी सर्वांचं एक स्वप्न असतं तर म्हणजे आपल्या स्वतःचे हक्काचं घर असावं. यासाठी कठोर मेहनत करुन पैसे जमवतात आणि आपल्या स्वप्नातील घर उभं करतात. पण हेच घर बनवण्यासाठी अनेक साहित्याची गरज भासते. यासाठी सिमेंट, लाकूड, लोखंड आणि विटांची गरज भासते. यातही घराच्या बांधकामात वीट (Bricks) हा एक महत्त्वाचा घटक असतो. घर बांधतांना एक-एक वीट रचत उंचच उंच इमारत उभारली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही वीट लाल रंगाचीच का असते? काळ्या, हिरव्या, निळ्या किंवा पिवळ्या रंगाच्या का नसतात? लाल रंगाची वीट बनवताना त्यात रंग मिसळला जातो का? तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे आता या लेखात मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा..

कशी तयार होते वीट : विटा बनवण्यासाठी कच्च्या मातीचा वापर केला जातो. यात 50 ते 70 टक्के वाळू मिसळली जाते. तर 20-30 टक्के अँल्युमिना, 2 ते 5 टक्के चुना, तसेच 1 टक्के मॅग्नेशियम आणि 7 टक्के लोह असते. हे मिश्रन विटा बनवण्यासाठी असलेल्या साच्यात टाकून त्याला विटेचा आकार दिला जातो. काही दिवस उन्हात वाळल्यानंतर त्या आणखी मजबूत बनवण्यासाठी भट्टीत उच्च तापमानात (सुमारे 875 ते 900 डिग्री सेल्सिअस) भाजल्या जातात.

विटेचा रंग लालच का असतो? : इतक्या उच्च तापमानात लोह आणि इतर धातू मातीत मिसळले जातात. लोह आणि इतर धातूंचं ऑक्साइड अँल्युमिना सिलिकासोबत मिळून लोह ऑक्साईड तयार होतो आणि हा लोह ऑक्साईड विटांना लाल रंग देतो. लाल मातीच्या भाजीव विटा अतिशय मजबूत मानल्या जातात. त्यामुळे बांधकामात लाल विटांचा मोठ्याप्रमाणावर वापर होतो. तसेच या विटांच्या किमतीही आवाक्यात असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे भाजीव लाल विटांनाच सर्वाधिक मागणी असल्याचे दिसते

दरम्यान, भारतामध्ये बहुतेक लहान गावांत अजूनही विटा हातांनीच तयार करतात किंवा साच्यात प्रत्येक वेळी एकच वीट तयार होते. काही ठिकाणी 22×22×7 सेंमी व काही ठिकाणी 19×9×9 सेंमी. अशा मापाच्या विटा बनवितात.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues