Take a fresh look at your lifestyle.

1 जानेवारीपासून मोठे बदल होणार; या बदलाचा थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर

0

पुढील काही दिवसातच 2023 चे नवे वर्ष सुरु होणार आहे. मात्र या नवीन वर्षाच्या सुरवातीलाच 1 जानेवारीपासून अनेक मोठे बदल होतात. यांनी याचाच थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्षात कोणते नियम लागू होणार आहे..

1) गाड्यांचे दर वाढणार :- नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारीपासून गाड्यांचे दर वाढणार आहेत. मारुती, हुंडाई, टाटा मोटर्स, मर्सिडीज बेंज, ऑडी, रेनॉल्ट, किआ इंडिया आणि एमजी मोटर 1 जानेवारी 2023 पासून आपल्या गाड्यांची किंमत वाढवणार आहे. त्यामुळे तुम्हाला कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

2) बँक लॉकरबाबत होणार मोठे बदल :- रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार, लॉकरमध्ये ठेवलेल्या मालाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आता बँकेची असेल. त्यासाठी ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करार करावा लागेल.

3) LPG च्या किमतीत बदल होण्याची शक्यता :- गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने नवीन वर्षात सरकारी तेल कंपन्या घरगुती गॅसच्या (एलपीजी) किमती कमी करू शकतात. वाहनांमधील ‘सीएनजी’, तसेच स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या ‘पीएनजी’ गॅसच्या किमतीही बदलू शकतात.

4) जीएसटी इनव्हॉइसिंग : सरकारने 2023 पासून GST E- Invoicing ‘जीएसटी’च्या ई-इनव्हॉइसिंगसाठी 20 कोटींची मर्यादा 5 कोटींपर्यंत कमी केलीय. ज्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय 5 कोटींहून अधिक आहे, त्यांनी आता इलेक्ट्रॉनिक बिलं काढणे (जनरेट) आवश्यक असेल.

नवीन वर्षापासून कार आणि बाईकच्या किमती वाढणार; जाणून घ्या किती वाढणार आहेत किंमती?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues