शेतातील व घरातील घूस, उंदीर मारण्याचे अगदी सोपे उपाय!
घूस, उंदीर सारखे प्राणी मारण्यासाठी युटूबर सांगितलेले किंवा ऐकीव उपाय हे अशास्त्रीय पद्धतीचे आहे. कारण यामुळे घुशींचा बंदोबस्त होत नाही. मात्र मनस्ताप नक्की होतो. असे होऊ नये यासाठी खालील गोष्टी तुमची मदत करतील….
आपल्या घराचे घुशींपासून प्रथम संरक्षण करायचे असेल तर आपल्या घरच्या आजूबाजूला उरलेल्या अन्नाचे तुकडे किंवा शिळे अन्न फेकून देणे टाळा.
बाजारात घुशींना मारण्यासाठी रकुमीन शुअर नावाचे औषध मिळते. हे औषध निवासी जागांवर, कुक्कुटपालनांमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यास घुशींवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.
पेपरमिंट : घुशींना पेपरमिंटचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे कापसावर थोडे पेपरमिंट म्हणजेच अस्मंतारा घेऊन घुस किंवा उंदीर येणाऱ्या रस्त्यात ठेवा. यामुळे हे उपद्रवी प्राणी येणार नाहीत आणि ते पळ काढतील.
फिनाईल गोळ्या : या गोळ्या कपड्यामध्ये गुंडाळून घुशींच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यात ठेवल्यास घुशींचा त्रास कमी होतो. तसेच कांद्याचा तीक्ष्ण वास घुशी सहन करू शकत नाही. म्हणून घुशी फिरत असेल त्या ठिकाणी कांद्याचे लहान-लहान तुकडे ठेवा. घुशी वासामुळे पळ काढतील.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup