Take a fresh look at your lifestyle.

रितेश देशमुख आणि जिनिलीयाच्या बॉण्डिंगचं रहस्य उलगडलं…

0

अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि जिनिलीया देशमुखचा (Genelia D’Souza deshmukh)आगामी मराठी चित्रपट ‘वेड’च्या (ved movie) टीझरमधील केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले. अगदी तशीच त्यांची खऱ्या आयुष्यातल्या केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडते. त्यांच्यातल्या या बॉण्डिंगचं रहस्य समोर आलं आहे.

रितेश आणि जिनिलीयाने (riteish-genelia) एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तेव्हा ते त्यांच्या नात्याबद्दल भरभरून बोलले. रितेश म्हणाला, जिनिलियानी एक नियम केलाय की, आपण एकमेकांना देत असलेली भेटवस्तू जर 5 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची असेल तर मग वर्षभरात आणखी वेगळं काही गिफ्ट एकमेकांना द्यायचं नाही. महागड्या वस्तूंपेक्षाही एकमेकांना दिलेला वेळ ही सर्वात मौल्यवान भेट असते. नात्यात मोठ्या गिफ्ट किंवा दिखाव्याची गरज नसते, तर एकमेंकाना वेळ दिला की नातं आपोआप जपलं जातं.

हेही वाचा – Fitness : जिमला जाताय? मग वाचा या खास टिप्स…

रितेश म्हणाला, आपण अनेकदा नात्यावर अपेक्षांचं ओझं लादतो. समोरच्या व्यक्तीची गरज मोठी झाली की नातं अयशस्वी होतं. तसंच समोरच्या व्यक्तीची कितीही मोठी चूक असली तरी माफ करायला शिकलं पाहिले. यामुळे नातं आणखी मजबूत होतं.

दरम्यान (ved movie)‘वेड’चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं असून या चित्रपटाद्वारे जिनिलीया मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार भूमिका साकारत आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली असून हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues