Take a fresh look at your lifestyle.

वर्षाच्या शेवटच्या आठवडा होणार चित्रपटप्रेमींसाठी खास मेजवानी; ‘हे’ चित्रपट आणि वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस

0

नवीन वर्षाची सुरुवात होताच सिनेप्रेमी हे नेहमीच नवीन चित्रपट आणि वेब सीरिजची प्रतीक्षा करू लागतात. परंतु यंदा वर्षाचा शेवट देखील सिनेप्रेमींसाठी खूप मनोरंजनाचा ठरणार आहे. कारण या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात 2022 च्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज यांच्याबद्दल….

भेडिया (Bhediya) : बॉलिवूडमधील अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांच्या भेडिया या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर काही खास यश मिळालं नाही. पण क्रिटिक्स आणि काही प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. त्यानंतर आता हा चित्रपट 30 डिसेंबरला जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

आर या पार (AAR Ya Paar) : भारतातील प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर 30 डिसेंबर रोजी ‘आर या पार’ हा चित्रपट रिलाज होणार असून या चित्रपटात आदिवासी समाजातील एका व्यक्तीची कथा दाखवण्यात आली आहे.

सेव्हन वंडर अँड अ मर्डर (7 Wonder And A Murder) : हॉलिवूडची क्राईम बेस्ड वेब सिरीज ‘सेव्हन वंडर अँड अ मर्डर’ ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. ही सीरिज आता याच आठवड्यात 28 डिसेंबर रोजी Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे.

टॉप गन-मेवेरिक (Top Gun-Maverick) : हॉलीवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझचा ‘टॉप गन-मॅव्हरिक’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला असून 26 डिसेंबर रोजी हा चित्रपट Netflix वर हिंदी आणि इंग्रजीमध्ये रिलीज करण्यात आला आहे.

तुम्हाला या वस्तूंवर 1% ही द्यावा लागत नाही टॅक्स; जाणून घ्या Tax Free वस्तूंची लिस्ट

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues