Take a fresh look at your lifestyle.

Tech Update : आता इंस्टाग्राम आणि फेसबुकची ‘ती’ फ्री सर्व्हिस बंद, आता महिन्याला द्यावे लागतील इतके रुपये

0

Tech Update : आपल्या पैकी बहुतांश लोक रोजच्या रोज सोशल मीडियाचा वापर हा करतोच.. सध्या जगभरात सोशल मीडिया कंपन्यांकडून फ्री सर्विस बंद करण्याचा धडाका लावला आहे. काही दिवसापूर्वी ट्विटरकडून पेड ब्लू टिक सर्व्हिस सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ट्विटरच्या वापरकर्त्यांची याबाबर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता ट्विटरप्रमाणेच मेटानेही एक मोठी घोषणा केली आहे.

मिळालेला माहितीनुसार फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक, इंस्टाग्राम संदर्भात एक महत्वाची घोषणा केली असून आता लवकरच ग्राहकांना ब्लू टिक सेवेसाठी फेसबुकला आणि इंस्टग्रामला पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनी या पेड सर्व्हिस फिचरची सुरुवात या आठवड्यात सर्वात प्रथम ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये करणार आहे.

तर मेटा व्हेरिफाईड सेवेची घोषणा करताना झुकरबर्ग यांनी युजर्सना किती रक्कम खर्च करावी लागेल हे देखील सांगितले आहे. व्हेरीफिकेशनसाठी युजर्सला दर महिन्याला 11.99 डॉलर्स (992 रुपये) आणि iOS वरील सेवेसाठी 14.99 डॉलर्स (1240 रुपये) दरमहा द्यावे लागणार आहेत. लवकरच ही सेवा भारतासह इतर देशांतही सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या पेड सर्व्हिस सोबत यूजरला आणखी काही खास सेवा मिळण्याची शक्यता आहे.

काय असेल खास
इंस्टाग्राम आणि फेसबुक पेड सब्सक्रिप्शन मॉडलमध्ये यूजर्सला काही खास सर्विस ऑफर करण्यात येवू शकते. सोबत एचडी व्हिडिओ अपलोड करण्यासोबत अनेक अन्य सर्विस दिली जावू शकते. आतापर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्राम वर प्रसिद्ध लोकांसाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन दिले जात होते. यात क्रिएटर्स, कंपन्या आणि ब्रँड्सचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues