Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी..!! टीम इंंडियाची मॅच स्टेडियममध्ये आता मोफत पाहता येणार

0

तुम्ही जर क्रिकेट प्रेमी असाल तर हि बातमी खरोखरच तुमच्यासाठी आनंदाची आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की, सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 (india vs australia women T20) मालिकेचा थरार रंगला असून या मालिकेतील सलामीच्या सामन्यात कांगारूच्या संघाने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात यजमान भारत संघाने विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. खरं तर सुपर ओव्हरमधील (Super over) अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 4 धावांनी पराभव केला.

परंतु, या मालिकेतील थरार अधिकाधिक अनुभवण्यासाठी मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात महिला क्रिकेट सामने पाहावेत यासाठी बीसीसीआयकडून एक जबरदस्त शक्कल लढवण्यात आली आहे. BCCI ने आता भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टी-20 मालिकेचे सामने मोफत ठेवले आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाचे पुढील सामने :-
▪️ 14 डिसेंबर –
तिसरा टी-20 सामना – ब्रेबॉर्न स्टेडियम (CCI-Brabourne Stadium)
▪️ 17 डिसेंबर – चौथा टी-20 सामना – ब्रेबॉर्न स्टेडियम
▪️ 20 डिसेंबर – पाचवा टी-20 सामना – ब्रेबॉर्न स्टेडियम

हेही वाचा :- फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये हा संघ दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबरला आसन क्षमतेनुसार चाहत्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून तथापि, त्यासाठी तुम्हाला bookmyshow.com वर नोंदणी करणे आवश्यक आहे. तर 17 आणि 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या खेळांसाठी, महिला चाहत्यांकडून शुल्क आकारले जाणार नाही, परंतु पुरुष आणि मुलांसाठी नाममात्र शुल्क (रु. 100-200) रुपये असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, BCCI च्या या निर्णयामुळे उर्वरित सामन्यांसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues