Take a fresh look at your lifestyle.

पशुपालकांनों बाजारातून गाई खरेदी करत असाल तर सावधान!! दूध उत्पादनक्षम गाईंची निवड कशी करावी?

0

दुधाळ गाय खरेदी करताना फसगत होण्याची शक्यता जास्त असते म्हणून खालील खात्री केल्यानंतरच गाय खरेदी करावी.

दुधाळ जनावर निवडीचे निकष काय असावेत?
● १५ ते २० दिवसांत विणारी गाभण गाय शक्यतो पशुपालकांनी खरेदी करावी त्यामुळेच दूध उत्पादन व्यवसाय किफायतशीररित्या करता येतो.
● दुभती गाय विकत घेतल्यास ती गाय गोठ्यात गेल्यावर २ ते ३ लिटर कमी दुध देते कारण वातावरणातील व खाण्यातील बदलामुळे.
● शक्यतो दुधाळ गायींची निवड करताना पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची गाई निवडावी.
● दुधाळ गायींची निवड करताना प्रथमता त्यांचे दुध उत्पादन, एकूण वेताची संख्या, दात, व बाह्यरूप इत्यादी गोष्टी तपासून पाहाव्यात.
● गायीच्या बरकड्या तीन पेक्षा जास्त दिसु नयेत. कारण जर गाईच्या तीन पेक्षा जास्त बरकड्या दिसत असतील तर त्या खर्चिक मानल्या जातात.
● गायीचा आकार समोरून पाहिल्यास त्रिकोणाकृती असावा व कपाळ सपाट असावे.
● दुधाळ गाय निवडताना तिचे दोन ते तीन वेळा दूध काढूनच दुधउत्पादनाची खात्री करून मगच गाई खरेदी करावी.
● गाईचे चारही सड सारख्या लांबीचे असावेत व कास शरीलाला घट्ट व मऊ असावी आणि कासेवरील शिरा ठसठशीत दिसाव्यात.
● गायीच्या अंगावर जास्त चरबी नसावी, त्वचा मऊ व तजेलदार असावी.
● डोके पुरेसे लांब,रुंद असावे व जबडा रुंद, मजबूत असावा.
● मान लांब, सडपातळ व पाठीचा कणा सरळ असावा.
● बरगड्या चपट्या असाव्यात व कमरेची हाडे रुंद व दणकट असावीत.
● गाईच्या मांड्या पातळ, अर्धगोलाकार असाव्यात व छाती भरदार तसेच रुंद असावी.
● खुरांचा रंग काळासर आहे का व त्याचा आकार समान, खुरसडा आहे का ते चौकसपणे बघावे.
● गाय चालवून-फिरवुन ती लंगडत नाही ना याची खात्री करून घ्यावी.
● सर्व अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध आहे का ते पाहावे व गाई चारही पायांवर समतोल उभी राहते का याचा अंदाज घ्यावा.
● गाय शांत स्वभावाची असावी कारण तापट स्वभावाच्या गाई उत्तेजित झाल्या की पान्हा चोरतात.
● पशुपालकांनी शक्यतो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गाई खरेदी करावी त्यासाठी धेनू अँप चा वापर केला तर अती उत्तम ठरेल, तेथे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गायी खरेदी करून मिळतील.

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

राहुल दत्तात्रय गलंडे
प्रकल्प समन्वयक/डेअरी प्रशिक्षक
धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड भोसरी, पुणे
मोबा.- ९४०५५५०६७१: ई-मेल [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues