Take a fresh look at your lifestyle.

Sula Vineyards IPO : वाईन कंपनी Sula Vineyards चा IPO 12 डिसेंबरला उघडणार, 1000 कोटी रुपये उभारण्याची तयारी!

0

Sula Vineyards IPO चा प्राइस बँड लवकरच उघड होईल. शेअर्स NSE आणि BSE वर लिस्ट केले जातील.
Sula Vineyards IPO : देशातील सर्वात मोठी देशी वाइन उत्पादक सुला विनयार्ड्स पुढील आठवड्यात आपला IPO (Sula Vineyards IPO) लाँच करणार आहे. सुला विनयार्ड्सचा IPO 12 डिसेंबर 2022 रोजी अर्जांसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदार 14 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतील. या IPO च्या माध्यमातून कंपनी बाजारातून 950 ते 1000 कोटी रुपये उभारू शकते. लवकरच प्राइस बँड देखील जाहीर केला जाईल.

जर सुला विनयार्ड्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली तर स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणारी ही देशातील पहिली वाईन बनवणारी कंपनी असेल. IPO 9 डिसेंबर 2022 रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी उघडेल. आणि IPO 12 ते 14 डिसेंबर दरम्यान लोकांसाठी खुला असेल. IPO मध्ये ऑफर फॉर सेलद्वारे निधी उभारला जात आहे. म्हणजेच कंपनीचे गुंतवणूकदार किंवा प्रवर्तक त्यांची इक्विटी विकतील. सुला विनयार्ड्स ऑफर फॉर सेलद्वारे प्रत्येकी 2 रुपयांचे 25,546,186 इक्विटी शेअर जारी करेल.

हेही वाचा : डिमॅट खाते वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणी वाढतील!

कंपनीला IPO आणण्यासाठी स्टॉक मार्केट रेग्युलेटर SEBI (Securities and Exchange Board of India) कडून आधीच मंजुरी मिळाली आहे. कंपनीने जुलै 2022 मध्ये आपला IPO लॉन्च करण्यासाठी SEBI कडे ड्राफ्ट पेपर (DRHP) दाखल केला होता. सुला विनयार्ड्सचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट केले जातील.

2021-22 मध्ये, सुला विनयार्ड्सचा महसूल 453.92 कोटी रुपये होता तर नफा 52.14 कोटी रुपये होता. 2020-21 मध्ये, महसूल 417.96 कोटी रुपये होता आणि नफा 3.01 कोटी रुपये होता. 1996 कंपनीची स्थापना झाली. सुला व्हाइनयार्ड्स 13 ब्रँड नावाखाली 56 प्रकारच्या लेबल केलेल्या वाईनचे उत्पादन करते. ही कंपनी वाईन मार्केटमधील दिग्गजांपैकी एक आहे. कंपनीचे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये चार मालकीचे आणि दोन भाडेतत्त्वावरील प्लांट आहेत. कंपनीचे दोन वाईन रिसॉर्टही नाशिकमध्ये आहेत.

कोटक महिंद्रा कॅपिटल, CLSA इंडिया आणि IIFL सिक्युरिटीज हे IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर KFin Technologies हे IPO चे रजिस्ट्रार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues