Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून एकदा पाचट आच्छादनाचे फायदे वाचा!

0

महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या ऊसाखालील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ४० ते ४५ टक्के खोडव्याचे क्षेत्र आहे. असे असले तरी सध्या खोडव्याची उत्पादकता कमी असल्याने एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा पहिला तर तो ३० ते ३५ टक्के इतकाच राहिला आहे. दरम्यान कमी उत्पादन खर्चामुळे उसाचे जास्तीत-जास्त खोडवे घेणे फायदेशीर ठरते आहे. म्हणून खोडव्याच्या योग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणे अत्यंत गरजचे आहे. शेताच्या स्वच्छतेचा विचार करता शेतकरी पाचट जाळतात. असे असले तरी पाचटाचे आच्छादन जमिनीवर केल्यास होणारे फायदे यापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे संशोधनात दिसून आलेले आहे.

‘हे’ आहेत पाचट आच्छादनाचे फायदे :
● ऊसामध्ये हेक्टरी ७-१२ टन पाचट तयार होते आणि त्यात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब व मूलद्रव्ये असतात.
● प्रतिटन पाचटाबद्दल विचार केला तर त्यामध्ये ५.४ किलो नत्र, १.३ किलो स्फुरद व ३.१ किलो पालाश व अन्य सूक्ष्म मूलद्रव्ये असतात. ती व्यवस्थित कुजली की, नंतर खोडव्याला उपलब्ध होतात.
● पाचट आच्छादनामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते आणि सोबत मातीतील ओलावा देखील टिकतो.
● तसेच पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढवणे शक्य होते.
● खोडव्याला कमी पाण्यात व दुष्काळी परिस्थितीतही तग धरणे सहज शक्य होते.
● सातत्याने वाढणारे गवत आणि तण नियंत्रणाचा खर्च देखील कमी होतो.
● शेतात गांडुळांची संख्या वाढते.
● जमिनीची सुपीकता वाढते. मूलद्रव्यात वाढ झाल्याने उत्पादनात १२ ते १३% ने वाढ होते.

पाचट जाळण्याचे परिणाम का?
● संशोधनानुसार, खोडव्याची उगवण क्षमता ६८ टक्के राहते; तर पाचट न जाळता केलेल्या योग्य व्यवस्थापनामुळे ती ८२ टक्के राते.
● पर्यावरणात प्रदूषण होते.
● जमिनीच्या वरच्या थरावर असणाऱ्या सूक्ष्मजीवांचे तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते.
● जमिनीची सुपीकता व भौतिक स्थिती बिघडते.
● अत्यंत अल्प प्रमाणात राख शिल्लक राहते.

म्हणून शेतातील पाचट लवकर कुजत नाही! :
● उसाच्या पाचटामध्ये कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर हे १२२:१ असे असते. यात कर्बाचे प्रमाण अधिक असले तरी नत्राची उपलब्धता कमी असल्याने जिवाणूंना अधिक वेळ लागतो.
● तर कर्बामुळे जिवाणूंना उर्जा मिळते; तर नत्रापासून प्रथिने मिळतात.
● जिवाणूंची चांगली वाढ व्हावी यासाठी पिकांच्या अवशेषांतील कर्ब:नत्र गुणोत्तर २४:१ असे असावे.

एकात्मिक ऊस पाचट व्यवस्थापन कसे करायचे?
● प्रत्येक सरीआड पाचट जमा करा. त्यात पाचट व्यवस्थित पसरून आच्छादन करा.
● जेथे पाचट नाही तेथे आंतरमशागत करता येते.
● शेतातील पाचट मऊ करण्यासाठी पाणी द्या. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येत असल्याने काळजीपूर्वक पाचट भिजवून घ्या.
● पाचटावर ७५ किलो प्रतिहेक्टर युरिया टाका. त्यामुळे पाचटाचे कर्ब:नत्र गुणोत्तर कमी होईल. त्यावर ५०० किलो शेणखतात अधिक २५ किलो पाचट कुजवणारे जीवाणू कल्चर मिसळून टाका.

‘या’ पद्धतीने शेतातील पाचट आणखी लवकर कुजेल!
● पाचटाची कुट्टी करून घ्या फायद्याचे ठरेल. त्यासाठी ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी यंत्र बाजारात उपलब्ध आहे.
● पाचट अधूनमधून भिजवत रहा. या साठी स्प्रिंकलर लावा. पाचट कोरडे झाल्यास कुजवणाऱ्या जिवाणूंची क्रिया मंदावते.
● पाचटाचे कर्ब:नत्र गुणोत्तर २४:१ च्या जवळ आणण्यासाठी उसाच्या पाचटातील नत्राचे प्रमाण वाढवा. त्यासाठी पाचटावर बाहेरून नत्र (युरिया) टाका.
● पाचट कुजवण्याचा वेग वाढवण्यासाठी शेणखत व जिवाणू कल्चर वापरा.
● शेतातील पाचटाचा ढीग करून कुजवल्यास अत्यंत कमी वेळेत खत तयार होते.
● तसेच महिन्याआड पाचटाची उलटापालट करा. याने जिवाणूंना आवश्यक ऑक्सिजन मिळून फायदा होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues