Take a fresh look at your lifestyle.

उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी Good News! उसाची एफआरपी किंमत वाढवली

0

चालू विपणन वर्ष 2020-21 साठी उसाचा रास्त आणि लाभदायक भाव 285 रुपये प्रति क्विंटल आहे. मोदी मंत्रिमंडळाने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने 2021-22 या वर्षासाठी उसाचे वाजवी आणि मोबदला (एफआरपी) दर 5 रुपयांनी वाढवून 290 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

दुसरीकडे, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उसाचा हमी भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना ऊस पिकवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

ते म्हणाले, की ” या निर्णयामुळे हे सुनिश्चित होईल की साखर कारखाने कार्यक्षम पद्धतीने कार्यरत राहतील आणि देशातील साखरेचे उत्पादन केवळ मागणी पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर निर्यातीची पूर्तता करण्यासाठी देखील उपलब्ध होईल.” या निर्णयाचा देशभरातील सुमारे 5 कोटी ऊस उत्पादकांना फायदा होईल.

चालू विपणन वर्ष 2020-21 साठी रास्त आणि लाभदायक किंमत 285 रुपये प्रति क्विंटल आहे. दरवर्षी ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकार एफआरपी जाहीर करते. ऊस उत्पादकांना ही किमान किंमत कारखान्यांना द्यावी लागते. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू सारखी अनेक राज्ये त्यांच्या उसाचे दर (राज्य सल्ला मूल्य किंवा एसएपी) जाहीर करतात. हे FRP वरचे असतात.

महाराष्ट्रातील उस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा :
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उस उत्पादक शेतकरी आहे. विशेष करुन पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. त्यामुळे एफआरपीमध्ये केंद्र सरकारने वाढ केल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. 

FRP नेमकं असतं काय?
FRP म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर, ज्याआधारे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करणे गरजेचे असते. यानंतर कमिशन ऑफ एग्रीकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेज ( CACP) दरवर्षी एफआरपीची शिफारस करतो. ही शिफारस CACP उसासह प्रमुख कृषी उत्पादनांच्या किंमतींबाबत सरकराला पाठवते. त्यावर विचार करुन केंद्र सरकार निर्णय घेते. शेवटी सरकार ऊस (नियंत्रण) आदेश, 1966 अंतर्गत एफआरपी निश्चित केली जाते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues