Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर! `कृषी`च्या ४५ हजार विद्यार्थ्याना मिळणार शुल्कमाफी

0

कृषीचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी खुशखबर शेअर केली आहे. त्यानुसार कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाणार आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सुट दिली जाणार आहे.

या निर्णयाचा राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकुण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे.जर विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परिक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देखील कृषीमंत्र्यांनी दिले आहे.

‘या’ शुल्कात १०० टक्के सुट (सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणारे इतर शुल्क) : विद्यार्थी मदत निधी, विद्यार्थी सुरक्षा विमा शुल्क, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुल्क, महाविद्यालय नियतकालिक, अश्वमेध/ क्रीडा महोत्सव शुल्क, विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शुल्क, ओळखपत्र, विद्यार्थी सहायता/ मदत/ कल्याण निधी, स्नेहसंमेलन, गुण पत्रिका शुल्क, नोंदणी शुल्क, या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च झालेला नाही, या बाबींसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १०० टक्के सुट दिली जाणार आहे

‘या’ शुल्कामध्ये ५० टक्के सुट! : जिमखाना, खेळ व इतर उपक्रम आणि ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च झाला असल्याने या शुल्कामध्ये ५० टक्के सुट दिली जाणार आहे. कायम विनाअनुदानित महाविद्यालयांनी आकारण्यात येणारे विकास शुल्क ( डेव्हलपमेंट फी) यामध्ये ५० टक्के सूट देण्याचे सांगण्यात आले आहे.

पूर्णपणे सूट : विद्यार्थ्यांकडून वसतिगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतिगृह शुल्का पोटी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात पूर्ण पणे सुट दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांकडे मागील सत्रामध्ये प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ हप्त्यात भरण्याची सवलत देण्याचे सांगण्यात आले आहे.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues