Take a fresh look at your lifestyle.

ST News : महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!! महिलांना आजपासून एसटी प्रवासात थेट 50 टक्के सवलत

0

ST News : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी विधीमंडळात सादर करण्यात आला होता. यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या होत्या. ज्यामध्ये महिलांसाठी अनेक योजना राबवणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये एसटीमधून प्रवास (ST News) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नव्हता. परंतु आता या बद्दलची एक महत्वाची बातमी समोर येत असून अखेर या आदेशाचा सरकारी जीआर (GR) निघाला आहे. शुक्रवारपासून (17 मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येईल. तसेच या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues