Take a fresh look at your lifestyle.

Solar Plant Yojana Latest Update 2022
‘या’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौरपंप

0

Solar Plant Yojana Latest Update 2022 देशातील शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था सुलभ व्हावी यासाठी केंद्र सरकारमार्फत सौर पंप योजना चालवली जाते. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी अनुदान देण्याचे काम सरकार करते. या योजनेत एक नवीन अपडेट करण्यात आले आहे. जाणून घेऊया त्या अपडेटबद्दल..

आता नवीन अपडेटद्वारे डिझेल सिंचन पंपाऐवजी सौर पॅनेलवर चालणारा सिंचन पंप वापरला जाणार आहे आणि दुसरे म्हणजे शेतकरी आता सरकारने बसवलेल्या सौर पॅनेलमधून कंपन्यांना वीज देऊ शकतात.

पीएम सोलर प्लांट योजना काय आहे ? :
देशात स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. 20 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोफत सोलर पॅनल योजनेचा (Solar Panel Yojana ) लाभ मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तसेच, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी 60 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. 2020 च्या अर्थसंकल्पात या योजनेबाबतचा अर्थसंकल्पही मंजूर करण्यात आला. Solar Plant Yojana Latest Update 2022

(PM Solar plant Scheme ) पीएम सोलर प्लांट स्कीम 2022 :
पंतप्रधान सौर प्रकल्प योजना 2022 अंतर्गत, या योजनेचा लाभ 15 लाख शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत 1 मेगावॅट सौर पॅनेल बसविण्यासाठी 5 एकर जागेची आवश्यकता असेल. नवीन अपडेटनुसार, शेतकरी सौर पॅनेलद्वारे तयार केलेली वीज सरकारी किंवा खासगी कंपन्यांनाही देऊ शकतात. Solar Plant Yojana Latest Update 2022

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.