Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर! आता स्मार्टफोनवरच समजेल मातीचं आरोग्य

0

सरकारकडून आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यास माती परीक्षण आणि जमिनीच्या आरोग्याविषयीची माहिती मिळावी यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार आता स्मार्टफोनवरच मातीचे आरोग्य समजणार आहे. जमिनीचे आरोग्य तपासण्यासाठी स्मार्टफोनचा कॅमेरा कसा उपयुक्त ठरू शकतो? याविषयी संशोधन सुरु आहे. एका वृत्तानुसार संशोधकांच्या पथकाने इमेजवर आधारित मातीतील सेंद्रिय घटकांच्या मूल्यांकनाचे म्हणजेच इमेज बेस्ड सॉईल ऑरगॅनिक मॅटरचे महत्त्वपूर्ण वर्णन केले आहे.

हे वर्णन जमिनीच्या सुपीकतेच्या मूल्यांकनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संशोधकांद्वारे विकसित करण्यात येत असलेले हे मोबाईल अ‍ॅप अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण यामुळे मातीतील सेंद्रिय घटक आणि जमीन सुपीकतेच्या स्थितीचे तातडीने अनुमान लावणे शक्य होणार आहे.
स्मार्टफोनवरील प्रतिमा किंवा इमेज विश्लेषण फायदेशीर आहे. कारण पारंपारिक पद्धतींना मर्यादा आहेत.

असे आहेत फायदे :

● स्मार्टफोन इमेजच्या माध्यमातून एसओएमची तातडीने तपासणी किंवा मूल्यांकन सोपे आहे.
● आफ्रिकन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॉन्ट न्युट्रिशनचे डॉ. कौशिक मुजुमदार यांनी सांगितलं, की एसओएम डेटा मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे.
● याचा वापर पीक उत्पादक क्षेत्रांमधील अचूक डेटावर आधारित शेती पुढे नेण्यासाठीची संधी म्हणून होणार आहे.
● या संशोधनासाठी भारतातील पश्चिम बंगालमध्ये अभ्यास केला गेला. यात राज्यातील तीन कृषी हवामानविभागातील मातींचे नमुने अभ्यासण्यात आले. मातीच्या रंगातील फरकांचे विश्लेषण करून एसओएम स्थिती मोजण्यासाठी प्रगत मॉडेलचा वापर केला गेला.
● हे तंत्र मातीचा पोषक स्तर, मातीची गुणवत्ता आणि तिच्या आरोग्याशी संबंधित अन्य वैशिष्ठे निर्धारित करते.
● मातीची छायाचित्रे घेऊन त्याबाबतच्या सविस्तर शास्त्रीय माहितीसाठी हे एक पाऊल असून, याचे रुपांतर उद्योग क्षेत्रात होण्यासाठी अधिक संशोधन व्हावे, असे मत संशोधक व्यक्त करत आहेत.
● या पुढील टप्प्यात मॉडेलच्या माध्यमातून माती नमुना छायाचित्रांची विस्तृत श्रेणी प्रदर्शित करण्यास प्रारंभ होईल.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues