Take a fresh look at your lifestyle.

Shirdi Maha Pashudhan Expo : ‘पंचामृत’मधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

Shirdi Maha Pashudhan Expo : काही दिवसांपूर्वी राज्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही राज्याचे ‘पंचामृत’ बजेट मांडले. या ‘पंचामृत’मधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठी आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रति शेतकऱ्यांना १८०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकार त्यात आणखी सहा हजार रुपये देत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी दहा हजार रुपये देखील दिले जात आहेत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर येथे केला.

Maha Pashudhan Expo 2023 अहमदनगर येथील महापशुधन एक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते.

Shirdi Maha Pashudhan Expo एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकरी हा राज्याचा केंद्रबिंदू आहे. आमचं सरकार हे देखील शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. म्हणूनच आज अहमदनगर येथे महापशुधन एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. आपल्या पशुधनावर मध्यंतरी लंपी आजाराचे सावट आले होते. मात्र, त्यावर तातडीने राज्यातील शेतकऱ्यांना लस उपलब्ध करुन देण्यात आली. राज्य सरकार हे कायम शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे.

Shirdi Maha Pashudhan Expo राज्य सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. आम्ही सादर केलेल्या बजेटमध्ये शाश्वत शेतीला प्राधान्य दिले आहे. या पंचामृत बजेटमधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठीच आहे. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Animal Protection Tips : प्राण्यांच्या जखमांत जंत झालेत? अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात गाई-म्हशी कमी दूध देतात? हे घरगुती उपायकरून बघाच

जनावरांना उसाचे वाढे खाऊ घालताय? काळजी घ्या नाहीतर जनावरांना इजा होऊ शकते

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues