Take a fresh look at your lifestyle.

Shetatle Anudan Yojana : बातमी कामाची! शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना आता मिळणार ‘इतके’ अनुदान

0

Shetatle Anudan Yojana शेतकरी आहात? आर्थिक अडचणी आहेत? मग हि बातमी तुमच्यासाठी दिलासादायक. आपल्या सर्वांना माहिती आहे कि नेहमीच राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘मागेल त्याला शेततळे’.

Shetatle Anudan Yojana मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना मागील अनेक वर्षांपासून चालत आली आहे. या योजनेचा आजपर्यंत असंख्य शेतकऱ्यांनी लाभ सुद्धा घेतला आहे. परंतु काही शेतकऱ्यांना शासनाच्या अपुऱ्या अनुदानाअभावी शेततळ्याची स्वप्न पूर्ण करता आले नाही. परंतु आता शेततळ्यासाठी अनुदान रकमेची वाढ करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.

Shetatle Anudan Yojana अनुदानात किती वाढ करण्यात आली :

कृषी विभागातर्फे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला असून शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत 50 टक्क्यांनी वाढ करून ते 75 हजार रुपये केल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. यापुढे शेततळ्याच्या अनुदानाच्या रकम हि शेतकऱ्यांना 75 हजार रुपये मिळणार आहे.

Shetatle Anudan Yojana शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अशी करावी नोंदणी :

▪️ http://egs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
▪️ अर्ज भरण्यासाठी प्रोफाइल वरून लॉगिन करा. व्यक्तिगत किंवा सामूहिक शेततळे हा पर्याय निवडा.
▪️ त्यानंतर अर्ज दाखल करून एप्लीकेशन नंबर लिहून ठेवा.
▪️ उल्लेख केलेल्या कागदपत्रांचा पीडीएफ मध्ये अपलोड करून सबमिट करा. डाऊनलोड केलेल्या फॉर्मवर सही करण्यासाठी जिथे जागा असेल तीथे सही करा.
▪️ तसेच दारिद्र्य रेषेखालील दाखला (असेल तर), आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे वारस दाखला (असेल तर) जमा करावा लागेल. तसेच सातबारा उतारा इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून ठेवा.

या योजनेसाठी अटी काय? :

▪️ स्वतः लाभार्थ्याच्या नावावर किमान 0.6 एकतर क्षेत्र व शेततळे खोदण्यास जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे.
▪️ शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करावे लागणार.
▪️ अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागील त्याला शेततळे सामूहिक शेततळे अथवा कुठल्याही योजनेतून शेततळे या घटकांसाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
▪️ पावसाळ्यामध्ये तळ्यात गाळ वाहून येणार नाही व साचणार नाही याची व्यवस्था तुम्हाला करावी लागणार.

हेही वाचा : कांद्याने शेतकऱ्यांना रडवले, महाराष्ट्रात भाव ‘इतके’ घसरले, इतर पिकांचीही अवस्था वाईट

सर्व काही बदलतंय परंतु शेतकऱ्यांचे नशीब नाही! मागील पाच महिन्यात राज्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांची आत्महत्या

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues