Take a fresh look at your lifestyle.

Shednet for Crops : शेडनेट उभारणी करताय ? या गोष्टी नक्की वाचा

0

शेडनेटगृहास जी शेडनेट लावायची आहे. ती युव्ही स्टॅबीलाईज्ड असणे अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक पिकाची चांगली वाढ होण्यासाठी त्याची स्वतःची विशिष्ट सूर्यप्रकाश व सावलींची अशी गरज असते. योग्य सावली गुंणाकांची शेडनेट निवडल्याने पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. पिका नुसार शेडनेटची टक्केवारी लक्षात घेऊन तिची निवड करावी.
शेडनेट १५%, ३५%, ४०%, ५०%, ७५% व ९०% या सावलीच्या टक्क्यांमध्ये उपलब्ध असतात. ३५% शेडनेट म्हणजे प्रकाशाची तीव्रता (लाईट इंटेसिटी) ३५ टक्क्यांनी कमी होईल व फक्त ६५ टक्के प्रकाशाची तीव्रता शेडनेटमधून आत जाईल.

शेडनेटगृहासाठी जागेची निवड :
निवडलेल्या जागेत भरपूर सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते.
जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी.
शेडनेटगृहासाठी पाणथळ जागा निवडू नये व तसेच शेडनेटगृहाची जागा खोलगट ठिकाणी नसावी.
पाणी पुरवठ्याची सुविधा जवळपास असावी, तसेच विद्युतपुरवठ्याची सुविधा असावी.

Agri Tech : तुम्हीही बनू शकता स्मार्ट शेतकरी, ‘या’ प्रगत तंत्रांनी शेतीमध्ये घडवा उज्ज्वल करिअर

शेडनेटगृहाची दिशा :
शेडनेटगृह उभारताना गोलाकार छत असलेल्या शेडनेटगृहाची दिशा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) अशी ठेवावी. मात्र सपाट शेडनेटगृहासाठी कुठलीही दिशा ठेवली तरी चालते.

शेडनेटगृह उभारतांना खालील बाबी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक असते :
शेडनेटगृहाचे फाऊंडेशन (पाया).
शेडनेटगृहाची फ्रेम (सांगाडा).
सांगाडा जोडण्यासाठी नटबोल्ट व क्लॅम्प.
शेडनेट (जाळी).
शेडनेट बसविणे.

शेडनेटगृहात लागवडीयोग्य पिके :
विविध भाजीपाला पिके रंगीत ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, ब्रोकोली, लेट्युस, वाटणा, फ्लॉवर, कोबी, वांगी, मिरची, भेंडी इतर. याचबरोबर सर्व भाजीपाला पिकांच्या रोपवाटिका, सर्व फळझाडे पिकांच्या रोपवाटिका आणि भाजीपाला पिकांचे बियाणे घेण्यासाठी शेडनेट चा वापर फायदेशीर ठरू शकतो.

शेडनेटगृहास जमिनीलगत सभोवती यु.व्ही. फिल्म लावणे (स्कर्टीग) :
बाहेरील वातावरणातील हवेत ३०० पीपीएम इतका कर्बवायू असतो. हरितगृहामध्ये रात्रीच्या वेळेस वनस्पतींनी केलेल्या कर्बवायूच्या उत्सर्जनामुळे कर्बावायुच्या पातळीत १००० ते १२०० पीपीएम इतकी वाढ होते. या कर्बवायूच्या पातळीत वाढ झाल्याने पिकांना त्यांच्या अन्न तयार करण्याच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत ३-४ पटींनी वाढ होते. शेडनेटगृहास स्कर्टीग केलेले नसल्यास हा कर्बवायू शेडनेटगृहात साठू न शकल्याने त्यापासून फायदा होत नाही. म्हणून यु.व्ही. फिल्मचे स्कर्टीग करणे फायद्याचे आहे.

IFFCO NANO Urea Export : आता NANO युरिया लिक्विड 25 देशांमध्ये होणार निर्यात; इफको वर्षअखेरीपर्यंत इतक्या कोटी बाटल्या तयार करणार

Gram Suraksha Yojana : शेतकऱ्यांसाठी कमालीची योजना! 50 रुपये गुंतवा आणि 35 लाख मिळेल परतावा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues