Take a fresh look at your lifestyle.

Subsidies for Athletes : ‘या’ क्षेत्रातील खेळाडूंच्या अनुदानात भरीव वाढ; क्रीडामंत्री गिरीष महाजन यांची माहिती

0

राज्यातील कबड्डी, खो-खो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या खेळांच्या खेळाडूंना राज्य स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी यापूर्वी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 50 लाखांवरून थेट 75 लाख रुपयांपर्यंत भरीव वाढ करण्यात आल्याची माहिती क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, राज्यातील क्रीडा स्पर्धा आयोजन निधीतून खेळाडू, पंच तसेच तांत्रिक पदाधिकाऱ्यांचा भोजन, निवास, प्रवास खर्च, रोख रकमेची बक्षिसे आदी बाबीवरील अत्यावश्यक असणारा खर्च भागविण्यासाठी या वाढीव निधीची मदत होणार आहे. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धा, कै. भाई नेरूरकर करंडक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात.

प्रमुख चार खेळ प्रकारांमधील क्रीडा स्पर्धा अनुदानात 25 लाख रुपये एवढी वाढ केल्यामुळे खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी मदत होईल. राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील खेळाडू निश्चितपणाने चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केलीय.

तसेच शासन निर्णयात असा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे की..

सदर स्पर्धांच्या आयोजनासाठी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेंतर्गत किंवा तरतुदीमधून (उदा. स्थानिक आमदार निधी, इत्यादी) निधी मंजूर झाल्यास आणि / किंवा खाजगी प्रायोजकामार्फत निधी मंजूर झाल्यास, शासनाकडून मंजूर अनुदान व अन्य स्रोतामधून प्राप्त निधी एकत्रित विचारात घेण्यात येईल. स्पर्धेच्या आयोजनासाठी या एकत्रित निधीपेक्षा प्रत्यक्षात कमी खर्च झाल्यास उर्वरित रक्कम शासनास परत करणे स्पर्धा आयोजकांना बंधनकारक राहील. याबाबतची जबाबदारी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा कार्यालयाची राहील, असं नमूद करण्यात आलं आहे.

Icc Men’s Cricket Ranking : ऐतिहासिक कामगिरी..!! आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा डंका

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues