Take a fresh look at your lifestyle.

कमाईची दुहेरी संधी! छतावर सौर पॅनल बसवा आणि पैसे कमवा…

0

सौरऊर्जेला प्रोत्साहन देणे, तसेच देशभरात सिंचनासाठी वापरले जाणारे सर्व डिझेल व इलेक्ट्रिक पंपाचा वापर घटवण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान अर्थात ‘कुसुम’ योजनेची घोषणा केली आहे. यामाध्यमातून शेतकरी शेतात सौर पॅनल बसवून त्यातून निर्माण होणारी वीज सिंचनासाठी वापरू शकतात. तसेच त्यातून उत्पादित होणारी वीज घरगुती वापरासाठी देखील काही प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल
योजनेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. एक म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत आणि पुरेशी वीज मिळेल आणि दुसरे म्हणजे अतिरिक्त वीज पॉवर ग्रीडला विकून उत्पन्नदेखील मिळणार आहे. यासाठी घरावर सोलर पॅनल बसवून चांगल्या प्रकारे पैसे देखील कमवता येणार आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती आज पाहूयात…
● या योजनेद्वारे आपण रिकाम्या जागेवर अथवा घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करू शकता.
● ही वीज आपण आपल्या घरगुती वापरासाठी वापरून ती दुसऱ्याला विकू देखील शकता.
● कठीण परिस्थितीत रोजगाराचे एक नवीन संधी म्हणून पीएम कुसुम योजना एक वरदान ठरू शकते.
● या माध्यमातून शेतकरी आपली शेतजमीन भाड्याने देऊन देखील चांगली कमाई करू शकता किंवा सौर पॅनल बसवून त्यातून उत्पादित होणारी वीज विकून नफा मिळवू शकतात.
● याअंतर्गत एखादी व्यक्ती सौर पॅनल बसवण्यासाठी आपल्या शेतजमिनीचा एक तृतीयांश भाग भाड्याने देऊ शकते.
● या बदल्यात कंपनी शेतकऱ्यांना जवळपास एकरी एक लाख रुपये भाडे देऊ शकते.
● याअंतर्गत एक एकर जमीन दिल्यास शेतकऱ्यांना एक हजार युनिट मोफत वीज मिळेल.
● या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कंपनी आणि अर्जदार यांच्यात सौर पॅनल सर्व बसविण्याबाबत आणि भाड्याने देण्यासाठी करार होतो.
● हा करार बहुदा पंचवीस वर्षांसाठी केला जातो. हा करार पूर्ण झाल्यानंतर भाडे वाढते.
● सौर पॅनल बसवण्यासाठीचा संपूर्ण खर्च ही कंपनी करते. मात्र जर वैयक्तिक वापरासाठी सौर बॅनर बसवायचे असतील तर सरकार देखील सूट देते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues