Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडिया सोड, आमच्या देशाकडून खेळ; संजू सॅमसनला ‘या’ देशांनी दिली ऑफर

0

भारतीय क्रिकेट संघाचा (Team india) युवा खेळाडू संजू सॅमसनला (Sanju Samson) सध्या बराच चर्चेत आहे. गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही वारंवार भारतीय संघातून डावलल्या जाणाऱ्या संजू सॅमसनबाबत त्यांच्या चाहत्यांकडून बीसीसीआयवर व मॅनेजमेंट टीमवर जोरदार टीका केली जात आहे. एवढेच नव्हे तर संजूला टीमबाहेर ठेवल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर बराच धुमाकूळ घातला. दरम्यान आता संजूच्या बाबतीत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संजूला भारतीय संघात संधी द्यावी, याची मागणी सततच संजूचे चाहते करत असून फिफा विश्वचषकादरम्यानही संजूचे चाहते त्याच्या नावाचे पोस्टर घेऊन कतारला पोहोचले होते. मात्र, इतकं होऊनही संजूला टीम इंडियामधून त्याला वागळ्यांत आले.

परंतु, आता संजूला थेट आयर्लंड (Ireland) संघाकडून खेळण्याची ऑफर आल्याच्या सांगण्यात येत आहे. व संजूने अवघा काही तासातच हि ऑफर धुडकावून लावली असल्याचे देखील सांगतले आहे. सॅमसनने या संधीला नम्रपणे नकार दिल्याचीही माहिती सूत्रांनी दिली असून आयर्लंड क्रिकेटने दिलेल्या ऑफरसाठी सॅमसनने त्या देशाचे आभारही मानले आहे. संजू यावेळी म्हणाला कि, ‘मी केवळ, भारताकडूनच खेळेन. इतर कोणत्या संघाकडून खेळण्याचा मी विचारही करू शकत नाही. संजू सॅमसनच्या या उत्तरांने करोडो भारतीय नागरिकांचं मन जिंकलं आहे.

संजू सॅमसनचं आजवरची आंतरराष्ट्रीय करियर :-

संजू सॅमसनने आतापर्यंत फर्स्ट क्लास करियरमध्ये एकूण 55 सामने खेळले आहे. ज्यामध्ये त्याने 37.64 च्या सरासरीने फलंदाजी करत 3162 रन्स केले आहेत. ज्यामध्ये 10 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues