पांढऱ्या मुळ्यापेक्षा कितीतरी पटीने महाग विकला जातो लाल मुळा, जाणून घ्या कशी होते लागवड?
पांढऱ्या मुळ्याची चव तुम्ही नक्कीच चाखली असेल, पण लाल मुळा फार कमी लोकांनी खाल्ला असेल. सामान्य मुळ्यापेक्षा यामध्ये अँटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात आढळतात. विशेष म्हणजे तो भारतात कुठेही लागवड करता येते. मात्र, त्याची किंमत पांढऱ्या मुळ्याच्या तुलनेत अनेक पटीने जास्त आहे. चला जाणून घेऊया लाल मुळ्याची लागवड कशी होते..
हिवाळ्यातील महिने लागवडीसाठी योग्य : शेतकरी हिवाळ्याच्या महिन्यांत पेरणी करू शकतात. डिसेंबर ते फेब्रुवारी हे महिने त्याच्या लागवडीसाठी अतिशय योग्य मानले जातात. त्यासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी चिकणमाती माती उत्तम मानली जाते. याशिवाय वालुकामय जमिनीतही याची लागवड करता येते. यासाठी जमिनीचे पीएच मूल्य 5 ते 7.5 दरम्यान असावे. त्याची मुळे (कंद) गडद लाल रंगाची असतात. त्याची पाने गडद हिरव्या रंगाची असतात.
- Chocolates For Cow : घ्या आता! गाई-म्हशींनाही चॉकलेट हवं! वाढवतेय दुधाचे उत्पादन
- Psychological Tricks : ‘या’ 5 सवयींमुळे इतरांबद्दल द्वेष वाढतो, तुम्हाला तर ही लक्षणे नाहीत ना? वाचा
- Animal Care : ऐकावं ते नवलंच! तुम्ही कधी प्राण्यांची साप्ताहिक सुट्टी ऐकली आहे का? येथे चक्क जनावरांना मिळतो 1 दिवस ‘वीक ऑफ’!
लाल मुळ्याची अशी लागवड करा : शेतकरी थेट पेरणी करून किंवा रोपवाटिका तयार करून त्याची लागवड करतात. त्याच्या व्यावसायिक लागवडीसाठी, रोपवाटिकांमध्ये प्रगत जातीच्या बियाण्यांपासून रोपे तयार केली जातात. रोपे लावण्यासाठी पंक्ती पद्धत वापरली जाते. पेरणीनंतर सुमारे 20 ते 40 दिवस लागतात. याच्या लागवडीमुळे तुम्हाला प्रति एकर 54 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
कमी खर्चात जास्त नफा : शेतकऱ्याने या पिकाची योग्य पद्धतीने लागवड केल्यास कमी वेळेत मोठा नफा मिळू शकतो. कमी शेतकऱ्यांनी लागवड केल्यामुळे लाल मुळा आजही क्वचितच बाजारात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्याची लागवड केल्यास त्यांना सामान्य मुळ्यापेक्षा जास्त नफा मिळू शकतो.
साधारणपणे, पांढरा मुळा जास्तीत-जास्त 50 रुपये प्रति किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. त्याचबरोबर एका किलो लाल मुळ्याची किंमत 500 ते 800 रुपये किलोपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी खर्चात या पिकातून अधिक नफा मिळू शकतो.
हेही वाचा : ‘या’ कोबीची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, जाणून घ्या काय आहे त्यात खास?