Take a fresh look at your lifestyle.

दुधातील फॅट कमी होण्याची कारणे काय?

0

दुधातील फॅट हा प्रतवारी च्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधातील फॅटवर दुधाची चव, स्वाद ह्या गोष्टी अवलंबून असतात. दुधाची किंमत देखील या फॅटच्या आधारे ठरवली जाते. गाईच्या दुधाची किमान फॅट 3.8 आणि म्हशीच्या दुधाची फॅट 6 असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा अनेक कारणांमुळे दुधातील फॅट कमी लागण्याची प्रमाण वाढते व शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. त्याची कारणे आणि उपाययोजना याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

‘ही’ आहेत दुधातील फॅट कमी लागण्याची कारणे :
● जनावरांची अनुवंशिकता किंवा जात.
● दूध उत्पादनक्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण एक गुणधर्म गुणसूत्रद्वारे नियंत्रित केले जाते.
● गावरान गाईंमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण ४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आढळते. जर्सी गाईच्या दुधात ५ टक्के, होल्स्टिन फ्रिजीयन गाईच्या दुधात ३ ते ३.५ टक्के एवढ्या कमी प्रमाणात स्निग्धांश आढळतात.
● दूध उत्पादन आणि फॅटचे प्रमाण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.

असा ठेवा जनावरांचा आहार :
● वर्षभर चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घाला.
● दुधातील फॅटचे प्रमाण वाढवण्यासाठी अ‍ॅसिटिक आम्ल महत्त्वाचा घटक आहे. हे तयार होण्यासाठी सुक्‍या चाऱ्यातील सेल्युलोज महत्त्वाचे असते. त्यासाठी गाई म्हशींना हिरव्या चाऱ्याबरोबर सुका चारा द्या.
● जनावरांच्या आहारात उसाचा वापर टाळा. कारण जनावरांच्या आहारात साखरेचे प्रमाण वाढले तर दुधातील फॅटच्या प्रमाणावर त्याचा परिणाम होतो.
● जनावरांच्या आहारात सरकीच्या तेलाचा अंश असल्यास फॅटमध्ये वाढ होते. परंतु खाद्यातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण वाढल्यास पचन क्षमतेवर वाईट परिणाम होतो आणि दुधाचे प्रथिनांमध्ये घट येते.

दूध काढण्याच्या वेळा पाळा :
● दूध काढण्याच्या वेळा आणि दूध उत्पादन व फॅट सी खूप जवळचा संबंध असतो.
● दूध काढण्याच्या दोन वेळा मध्ये जास्तीत-जास्त बारा तासाचे अंतर ठेवा.
● हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढेल पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.

जनावरांचे वय व वेताची संख्या
● जनावरांचे वाढते वय पाहता दुधातील फॅटचे प्रमाण कमी कमी होते.
● पहिल्या वेतात फॅटचे प्रमाण जास्त मिळते. नंतर ते कमी-कमी होत जाते.
● साधारणपणे गाय व्यालापासून 31 दिवसांमध्ये दूध वाढते आणि 50 ते 60 दिवसांपर्यंत टिकून राहते परंतु दूध वाढीबरोबर या काळात फॅटचे प्रमाण कमी होत जाते.
● याउलट गाय जशी आटत जाते तसे दूध उत्पादन कमी होऊन दुधातील फॅटचे प्रमाण वाढत जाते.

दुधाळ जनावरांतील आजार : संकरित गाईमध्ये कासदाह हा कासेचा आजार दिसून येतो. अशा गाईच्या दुधातील फॅटचे प्रमाण सरासरी पेक्षा जवळजवळ निम्म्याने कमी झाले असते. गायीच्या गाभण काळातील आरोग्याचेही दुधातील फॅटवर परिणाम होतात.

ऋतुचक्र :
● सर्वसाधारणपणे दूध वाटले की फॅटचे प्रमाण कमी होते. तर उत्पादन कमी झाले की फॅट वाढते.
● पावसाळ्यात, हिवाळ्यात हिरवा चारा मुबलक असल्याने दूध उत्पादन वाढते परंतु फॅटचे प्रमाण कमी होते.
● उन्हाळ्यामध्ये कोरड्या वैरणीचा समावेश असल्याने दुधातील स्निग्धांश व वाढलेली दिसून येते.
● उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ झाल्यास जनावरे अधिक पाणी पितात तर कमी चारा खातात. अशा वेळी त्यांच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादन आणि स्निग्धांशाचे प्रमाण कमी होते.

दुधातील फॅटचे प्रमाण वाढवण्याच्या उपाय योजना

● जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्यासह वाळलेल्या वैरणीचा समावेश करा.
● उसाच्या वाड्यांचा वापर टाळावा.
● भाताचा पेंढा, गव्हाचा काड इत्यादी प्रकार असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील फॅट कमी होतात.
● गाई म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मक्का, भरडा, तुर, हरभरा, मुगचुनी, गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्या. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देणे टाळा.
● दूध काढताना जनावरांची कास स्वच्छ धुवा. याने कासेतील रक्ताभिसरण वाढेल.
● कासदाह झाल्यास पशुतज्ज्ञांकडून त्वरित उपचार करा.
● जास्त वयस्क जनावरे, सातव्या वेताच्या पुढील दुधाळ जनावरे गोठ्यात ठेवू नका.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues