Take a fresh look at your lifestyle.

RBI New Rules on Bank Locker : बँक लॉकरमधून दागिने चोरी झालेत? मग तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळते का? जाणून घ्या RBI चा नियम काय सांगतो

0

RBI New Rules on Bank Locker : आपल्यापैकी बरेच जण आपले महागडे दागिने आणि सामान बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. याचे मुख्य कारण म्हणजे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सामान घरापेक्षा जास्त सुरक्षित असते. यासाठी वर्षाला काही रक्कमही तुम्हाला बँकेत भरावी लागते. पण जर बँकेतूनच तुमच्या वस्तू किंवा पैसे चोरी झाले आणि याची जबाबदारी बँक घेत नसेल तर अशावेळी ग्राहकांना मोठा धक्का बसू शकतो. पण आता असं होणार नाही. बँक लॉकरमधून ग्राहकाचं नुकसान झाल्यास बँक आता हात झटकू शकत नाही. काय सांगतो RBI चा नियम? जाणून घ्या थोडक्यात…

RBI च्या वेबसाइटवर मिळालेला माहितीनुसार.. तुमच्या लॉकरचं जर नुकसान झालं तर ती जबाबदारी बँक झटकू शकत नाही. त्याला बँकेतील कर्मचारी देखील जबाबदार असतात. सुप्रीम कोर्टानं RBI ला बँक लॉकरच्या सुरक्षेबाबत पावले उचलण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने लॉकरच्या सुरक्षेबाबत नवीन नियम जारी केले.

हा नियम यावर्षी 1 जानेवारीपासून लागू झाले आहेत. नवीन नियमांनुसार, बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या ग्राहकाच्या कोणत्याही मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाल्यास बँक व्यवस्थापन जबाबदार असेल आणि त्यांना लॉकरच्या 100 पट भाडे ग्राहकांना द्यावे लागेल. नव्या नियमानुसार लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे आग, चोरी, दरोडा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे नुकसान झालं असेल आणि बँकेने यात निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाले आहे. घटना घडली, तर ती ग्राहकाला भरपाई द्यावी लागेल. तो कोणत्याही परिस्थितीत त्याच्या जबाबदारीपासून पळ काढू शकणार नाही.

दरम्यान, RBI च्या सूचनांचे पालन करून, बँकांनी या वर्षापासून नवीन लॉकर कराराचे स्वरूप देखील जारी केले आहे. लॉकर सुविधेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांना आणि बँकांना या करारावर स्वाक्षरी करावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues