Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे प्रवाशांना सुखद बातमी; आता प्रवासादरम्यान मिळणार गोडाधोडाचे जेवण

0

रेल्वे प्रवास करणाऱ्यांना आनंदाची बातमी.. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भोजनात काही खास पदार्थ मिळणार आहे. भारतीय रेल्वेने नुकतेच एक जारी केलेल्या मेन्यू कार्डमध्ये महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील काही पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे प्रवाशांना आपल्या आवडीनुसार पाककृतींचा आस्वाद घेता येणार आहे. IRCTC ने जरी केलेल्या मेनू कार्ड मध्ये विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात गोडधोड भोजन दिले जाणारे आहे.

दरम्यान, यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील सणावाराला केली जाणारी पुरणपोळी देखील प्रवाशांना मिळणार आहे. इतकंच काय तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकवली जाणारी बाजरीच्या पदार्थांचा देखील यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे पौष्टिक तृणधान्य बाजरीच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी 2023 हे वर्ष भारतात ‘बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून साजरे करणार आहे. त्यामुळे ‘IRCTC’तर्फे केंद्र सरकारच्या पौष्टिक खाद्यपदार्थांच्या उपक्रमाचा उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे नव्याने जारी करण्यात आलेल्या ‘मेन्यू’मध्ये देखील बाजरी असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues