Take a fresh look at your lifestyle.

ट्रेनने प्रवास करण्याचा प्लॅन कॅन्सल झालाय? मग आता घरबसल्या करा तिकीट कॅन्सल बुलेटच्या स्पीडनं मिळेल रिफंड

0

आपल्या पैकी अनेकांना काहीना काही कारणानं प्रवास हा करावा लागतोच. तसं पाहिलं तर आजच्या काळात प्रवासासाठी कार, दुचाकी, बस, रेल्वे, विमान अशी अनेक साधनं उपलब्ध आहेत. आपला प्रवास स्वस्त, आरामदायी आणि कमी वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी लोक नेहमीच प्रयत्नशील असतात. यासाठीच लोकांची पहिली पसंती असते, ती म्हणजे भारतीय रेल्वे प्रवासाला. कारण आरामदायी प्रवासासोबतच परवडणाऱ्या किंमतींमुळं देशातील लाखो लोक दररोज ट्रेननं प्रवास करतात.

आपल्या माहिती आहे कि रेल्वेनं प्रवास करण्यासाठी लोक रेल्वेचं तिकीट आधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन पद्धतीने बुक करतात. आणि मग त्यानंतरच ते ट्रेननं प्रवास करतात. परंतु बऱ्याचदा अनेक जण रेल्वे तिकीट बुक करतात, मात्र विविध अडचणींमुळं त्यांना प्रवास करता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांना त्यांचं कन्फर्म तिकीटही रद्द करावं लागतं. परंतु तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना एक समस्या अनेकदा भेडसावते. ही समस्या म्हणजे रिफंडची रक्कम. तिकीट रद्द केल्यानंतर तुम्हालाही रिफंड लवकर मिळावा असं वाटत असेल, तर तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.. तर चला तर मग, जाणून घेऊया तिकीट रिफंड लवकरात लवकर मिळण्याचे काही सोपे मार्ग

तिकीट रिफंड प्रोसेस (railway ticket refund) :

जर तुम्ही कोठेतरी जाण्यासाठी कन्फर्म ट्रेन तिकीट बुक केलं असेल आणि तुम्हाला ते काही कारणास्तव रद्द करावं लागलं असेल, तर IRCTC नुसार i-pa द्वारे तुम्हाला कॅन्सल केलेल्या तिकिटाचा परतावा मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. यासोबतच येथून रेल्वेचं तिकीटही लवकर बुक करता येतं.

जलद रिफंड मिळण्याची सोपी प्रक्रिया :

जर तुम्हाला लवकर परतावा मिळवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं बँक खातं, डेबिट कार्ड किंवा UPI तपशील आय-पे गेटवेमध्ये द्यावे लागतील. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही येथून ट्रेनचे तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला पुन्हा येथे कोणतीही पेमेंट माहिती देण्याची गरज नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues