Take a fresh look at your lifestyle.

Railway Station Written Yellow Board : रेल्वे स्टेशनचं नावे पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिलं जातात? जाणून घ्या खास कारण

0

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. देशात दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात आणि देशातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या 7349 इतकी आहे. तुम्हीही आजवर कधीतरी रेल्वेमधून प्रवास नक्की केला असेल, तर तुमच्या लक्षात आले असेल की, रेल्वे स्थानकांची नावे नेहमी पिवळ्या रंगाच्या साइनबोर्डवर लिहिलेली असतात. पण असे का असते? हे जाणून घेण्याचा कदाचित तुम्ही कधी प्रयत्न केला नसेल. पण आज आम्ही तुम्हाला या मागचे खास कारण सांगणार आहोत.. (Why railway station names are written on yellow board only)

रेल्वे स्टेशनचं नाव का पिवळ्या रंगात असतात :

  • पिवळा रंग हा भडक रंगांपैकी एक रंग आहे. त्यामुळे हा रंग अगदी दूरवरुनही सहज चमकतो. तसेच लाल रंगानंतर पिवळ्या रंगाची वेवलेन्थ सर्वात जास्त असते.
  • तसेच प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या रंगाचा बोर्ड लोका पायलटला दूरवरुनच दिसतो आणि त्यानुसार तो ट्रेनचा स्पीड कमी करतो. एवढेच नव्हे तर ट्रेन कधी आणि कुठे थांबवयाची आहे याचा अंदाज बोर्डमुळे लोको पायलटला येतो. 
  • दिवसात पिवळा रंग उन्हात दूरवरुनही चमकतो, तर तर रात्रीही पिवळा रंग स्पष्टपणे दिसतो. त्यामुळेच रेल्वे स्टेशनवर पिवळ्या रंगाच्या बोर्डचा वापर केला जातो. पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या रंगाची अक्षरं ठळकपणे उठून दिसतात. याशिवाय उन आणि पावसाचही पिवळ्या रंगावर फारसा परिणाम होत नाही. 

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues