Take a fresh look at your lifestyle.

Prajakt Tanpure : आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, प्राजक्त तनपुरेंनी राम सातपुतेंना सुनावले

0

ब्राह्मणीतील धर्मांतर प्रकरणी राहुरी (rahuri) येथील पोलीस निरीक्षक दराडे यांची बदली करण्यात आली. त्या निषेधार्थ आमदार प्राजक्त तनपुरे (MLA Prajakt Tanpure) यांच्या नेतृत्वाखाली राहुरीत दोन दिवसांपूर्वी मोर्चा काढण्यात आला.

यावरून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी ट्विट करतं तनपुरेंवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना “राम सातपुते (MLA Ram satpute) यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये!”, असे तनपुरे यांनी सुनावले.

राम सातपुते ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘राहुरीत ख्रिश्चन मिशनऱ्यांचा हस्तक पी. आय. दराडेच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला.

आमदार तनपुरे यांच्या आशीर्वादानेच हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतर सुरू आहे. तनपुरे लक्षात ठेवा! भविष्यात तुमचा हिशोब हिंदू नक्की चुकता करतील,’ असे त्यांचे म्हणणे होते.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले, “राम सातपुते यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्वाच्या आडून सुपाऱ्या घेऊन, अधिकाऱ्यांवर दडपशाही करणे हा आमचा स्वभाव नाही.

आम्ही देखील खरे हिंदू आहोत. सर्वसामान्यांच्या विकासासाठी आम्ही वेळ देतो. दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यावर कोणाच्या तरी सांगण्यावरून दबाव आणणे, हिंदुत्वाच्या आडून अशी फालतू काम आम्ही कधी करत नाहीत.

त्यामुळे मला कोणी हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील लोकांनी २५ हजारांच्या मताधिक्क्याने निवडून दिले आहे. मी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन सर्वांना न्याय देण्याचे काम करतो, असा टोलाही तनपुरे यांनी लगावला.

हेही वाचा : रोहित शर्मा, विराट कोहलीला मागे टाकत या भारतीय फलंदाजाने 2022 मध्ये केल्या सर्वाधिक धावा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues