Take a fresh look at your lifestyle.

PSI Exam : पीएसआय परीक्षा देणाऱ्या महिला उमेदवारांसाठी खूषखबर!

0

PSI Exam महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आल्याने महिला उमेदवारांना फायदा होणार आहे. त्यानुसार 400 मीटर धावणे आणि लांब उडीऐवजी आता 3 किमी वॉकिंग 200 मीटर धावणे आणि गोळाफेक अशी चाचणी घेतली जाईल. तसेच शारिरिक चाचणी 60 ऐवजी आता पूर्वीप्रमाणेच 100 मार्कांची असणार आहे.

PSI Exam अगोदरची चाचणी कशी होती? तर शारीरिक चाचणीमध्ये 60 गुण मिळवणं अनिवार्य करण्यात आलं होतं. तसेच शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज ही अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येणार होता. या चाचणीमध्ये कमी गुण मिळाल्यास उमेदवार मुलाखतीला पात्र ठरू शकत नव्हते. त्यामुळं आता शारीरिक चाचणीला अधिक महत्त्व आलं होतं. तसेच या गुणांचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही, असंही आयोगानं स्पष्ट केले होतं.

हेही वाचा – रितेश देशमुख आणि जिनिलीयाच्या बॉण्डिंगचं रहस्य उलगडलं…
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी..!! टीम इंंडियाची मॅच स्टेडियममध्ये आता मोफत पाहता येणार

PSI Exam गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पीएसआय पदी काम करणाऱ्या माणसाला फिल्डवर भरपूर काम करावं लागतं, त्यासाठी या पदावर असणारा व्यक्ती तेवढा तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. परीक्षार्थी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचून अनुत्तीर्ण होण्यापेक्षा आधीच त्याची शारीरिक क्षमता तपासणं महत्वाचं आहे. शारीरिक चाचणीमध्ये अपयशी ठरल्यास परीक्षार्थी दुसऱ्या पर्यायांचाही विचार करू शकतो. त्यामुळं ही अट घातली असावी, असं काही तज्ज्ञांचं मत होतं.

PSI Exam नवीन बदल काय? : तर पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर शारीरिक चाचणी आणि मुलाखत महत्वाचा भाग असेल. पूर्वपरीक्षा ही 100 गुणांची असते. पीएसआय, एसटीआय या सर्व पदांसाठी ही एकच परीक्षा असते. त्यामधून फक्त मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जाते. हे गुण मुख्य परीक्षेमध्ये ग्राह्य धरले जात नाही. पण, मुख्य परीक्षा वेग-वेगळी असते. यामध्ये पदांसंबंधी एक वेगळा पेपर असतो. पीएसआय पदासंबंधी माहिती त्या पेपरमध्ये विचारलेली असते. ही परीक्षा 200 गुणांची असते. त्यानंतर 100 गुणांची शारीरिक चाचणी आणि 40 गुणांची मुलाखत आहे. मुख्य परीक्षेचे 200, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचे 140 गुण असे एकूण 340 पैकी निकाल लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues