Take a fresh look at your lifestyle.

फायद्याची शेती मका शेती; पहा, तुम्ही करू शकता की नाही?

0

हंगामानुसार मक्याच्या विविध जातींची लागवड केली जाते. दरम्यान मका पेरण्यापूर्वी शेतात शेणखत टाका. शेतात नांगरणी व २-३ वेळा फराट हाकून शेत भुसभुशीत करा.

मक्याची पेरणी 1-1 फूट किंवा 10-10 इंच अंतरावर करा. तुमच्या शेताच्या बाजूला वन्य प्राणी असतील तर तुमच्या शेताला चारही बाजूंनी काटेरी तारांनी वेढून टाका. दर काही दिवसांनी तुमचे पीक तपासा. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग दिसला तर त्यापासून मुक्त होणे सोपे जाईल.

एका हेक्टरसाठी (अडीच एकर) सुमारे 20-25 किलो मक्याचे बियाणे लागते. नेहमी मक्याचे चांगले बियाणे निवडा. कोणत्या हंगामात कोणती वाण चांगले उत्पादन देते? हे ध्यानात ठेवा. एक हेक्टर शेतात सुमारे 150 क्विंटल मका (मक्याचे धान्य) उत्पादन घेता येते.

नफा वाढणवण्यासाठी तुम्ही बाजारात मक्याचे कणीस स्वरूपात मका विकू शकता. एक कॉर्न सुमारे अर्धा किलो असतो आणि बाजारात तो 12-15 रुपये किलोने विकला जातो.

सर्व मका स्वतःच कॉर्नच्या (कणीस) स्वरूपात विकला तर तुमचे शेत लवकर रिकामे होईल आणि तुमचे उत्पादन एका हेक्टरमध्ये 250 क्विंटलपर्यंत होऊ शकते. यात दरही चांगले असतील. कॉर्न सरासरी 12 रुपये किलोने विकला गेला तरी 250 क्विंटलपासून तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. यामध्ये तुमचा खर्च 50 हजार रुपयांच्या जवळ येतो.

जरी तुम्ही मका धान्य विकले तरी 150 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळेल. पीक सरासरी 20 रुपये किलोने विकले जाईल. अशाने तुम्हाला 3 लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल. र्षातून किमान दोनदा मक्याचे पीक घेतले तर तुम्ही वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता.

आपण जे पहिले ते कृषी विद्यापीठाने सांगितलेले गणित आहे. त्यामुळे आपणही स्थानिक बाजारभाव आणि आपला आवाका लक्षात घेऊन मका पिक लागवडीचे नियोजन करा.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues